#KamleshTiwariMurder 'त्या' तिघांनीच केली कमलेश तिवारींची हत्या

3 suspect arrested from Surat in case of Kamlesh Tiwari Murder case
3 suspect arrested from Surat in case of Kamlesh Tiwari Murder case
Updated on

सूरत : हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची काल (ता. 18) लखनौमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांच्या शोधानंतर हा कट गुजरातमध्ये रचल्याचे गुजरातच्या एटीएसने सांगितले आहे. तसेच सूरतमधून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे.

तिघांच्या चौकशीनंतर या तीन संशयितांनी ते या हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचे कबूल केले आहे. डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते, याच रागातून त्यांची हत्या केल्याचे या तीन संशयितांनी सांगितले आहे.  

काल सकाळी लखनौमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची त्यांच्याच नाका भागातील कार्यालयात 2 अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. भगव्या कपड्यात आलेल्या दोघांनी आधी त्यांच्याशी चर्चा केली, चहा घेतला. त्यानंतर मिठाईच्या डब्यातून आणलेल्या चाकूने वार करून तसेच त्यांच्यावर गोळीबार करून तेथून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या तिवारींना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

डिसेंबर 2015 मध्ये मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत तिवारींवर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घेण्यात यावा, असे आदेश दिले होते.

दरम्यान, कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास 100 नंबर डायल करत होता. मात्र, त्याचा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही. घटना घडल्यानंतर अर्धा तास उलटून गेल्यावर पोलिस पोहोचले, अशी माहिती तिवारी यांच्या नोकराने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.