नवी दिल्ली- माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नसतो, कधी काय होईल हे सांगता येत नाही असं म्हटलं जातं. याची प्रचिती देणारा एक प्रसंग समोर आला आहे. बँकेत काम करणाऱ्या एका ३० वर्षीय कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने जागेवर मृत्यू झाला आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील महोबामध्ये एचडीएफसी बँकेमध्ये कृषि-महाप्रबंधक म्हणून राजेश कुमार शिंदे काम करायचा. तो सगळ्यांसारखं ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काम करत होता. यावेळी खुर्चीवर बसल्या-बसल्याच त्याने मान मागे टाकली आणि त्यांचा मृत्यू झाला. घटना १९ जून रोजीची आहे.
सदर व्हिडिओमध्ये दिसतंय की, कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांशी बोलत बसला होता. पण, अचानक त्याला काहीतरी होतं आणि तो अस्वस्थ होतो. त्याला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागतो. त्याच्या शेजारी बसलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या हे उशिरा लक्षात येतं. ते कर्मचाऱ्याजवळ जाऊन त्याच्यावर छातीवर दाब टाकून बघतात, त्याच्या तोंडावर पाणी मारतात. पण, जेव्हा मृत्यू बोलावतो तेव्हा कोणीही त्याला अडवू शकत नाही.
राजेशला शुद्धिवर आणण्याचा प्रयत्न झाला. त्याला सीआरपी देण्याचा प्रयत्न झाला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचे जीवन संपले. सदर घटना ही धक्कादायक आहे. राजेशचे वय फक्त ३० होते, तो तंदुरुस्त होता. पण, अचानक काम करता करता त्याला हृदय विकाराचा झटका आला अन् सगळं संपलं. त्यामुळे माणसाच्या आयुष्याचा काही भरोसा नसतो असं जे म्हणतात ते खरंच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.