BJP Cluster Meeting: 2024 साठी भाजप अन् मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी भाजपच खास प्लॅन; 300 जणांची स्पेशल टीम करणार काम

दिल्लीत भाजपच्या क्लस्टर बैठकीत काय घडलं विनोद तावडेंनी सांगितला प्लॅन
Vinod Tawade
Vinod Tawade
Updated on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज भाजपच्या प्रमुख नेत्यांची क्लस्टर बैठक पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी या बैठकीत नेमक्या कुठल्या गोष्टींवर चर्चा झाली याची सविस्तर माहिती दिली. (300 special workers will work towards making candidates of BJP and its allies win says vinod tawade)

300 प्रमुख कार्यकर्ते करणार काम

तावडे म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीसाठी जिथं जिथं भाजपचे उमेदवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्यांना जिंकून आणण्याासाठी ३०० प्रमुख कार्यकर्ते सक्रीय राहणार आहेत. आज या कार्यकर्त्यांबरोबर बसून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकाल लक्षात घेता मतमोजणीपासून आजपर्यंतचा एक उलटं वेळापत्रक बनवलं. यामध्ये काय असायला हवं, काय करणं गरजेचं आहे? याचा समावेश असेल. (Marathi Tajya Batmya)

Vinod Tawade
Rahul Narvekar: नेमकं चुकतंय कोण? ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला नार्वेकरांनीही दिलं पुराव्यांसह प्रत्युत्तर; वाचा काय म्हणाले?

2014 नंतरचा विकसित भारत कसा?

यामध्ये लाभार्थ्यांना संपर्क कधी आणि कसा करायचा. नव मतदार जे विशेषतः २१ व्या शतकात जन्मले आहेत, त्यांना संमेलनाच्या स्वरुपात एकत्र करुन २०१४ पूर्वीचा आणि २०१४ नंतरचा विकसित भारत याची माहिती कशी पोहोचवायची. तसेच मागास, दलित, आदिवासी, तरुण आणि महिला या सर्व घटकांपर्यंत कशा प्रकारे पोहोचता येईल याबाबत मोदी सरकारनं जे काम केलं आहे, याबाबतची रचना बनवण्यात आली. (Latest Marathi News)

Vinod Tawade
ShivSena Maha Press: ठाकरेंच्या सेनेचा 'लाव रे तो व्हिडिओ'! नार्वेकरांचा शिवसेनापक्षप्रमुख पदाचा दावा काढला खोडून

निवडणूक जिंकणं गरजेचं का?

गृहमंत्र्यांनी या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्पष्टपणे सांगितलं की, आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी लढायची नाही पण पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाची कल्पना वास्तवात उतरवण्यासीठी ही निवडणूक जिंकणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.