नवी दिल्ली - देशभरातील (India) तब्बल ३० हजार ०७१ एवढ्या मुलांनी (Children) कोरोना संसर्गामुळे 9Corona Infection) पालक (Parents) गमावले असल्याची धक्कादायक बाब विविध राज्यांनी ५ जूनपर्यंत सादर केलेल्या माहितीतून (Information) उघड झाली आहे. (30000 Children Orphan by Corona)
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने याबाबतची माहिती आज सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केली. तब्बल २६ हजार १७६ मुलांनी त्यांचे पालक गमावले असून त्यातील ३ हजार ६२१ अनाथ झाले असून २७४ जणांना पालकांनीच सोडून दिल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक मुले अनाथ झाले असून त्यांची संख्या ७ हजार ०८४ एवढी आहे. अनेक राज्यांनी त्यांच्याकडील अनाथ झालेल्या मुलांची माहिती अद्याप बाल स्वराज पोर्टलवर अपलोड केली नसल्याचे आयोगाने म्हटले. आयोगाने याबाबतचे शपथपत्र न्यायालयामध्ये दाखल केले आहे. दिल्लीची बाजू मांडणारे वकील चिराग श्रॉफ म्हणाले की, ‘‘याबाबतची सगळी माहिती ही बालकल्याण समितीकडून देण्यात आली असून अन्य विभागांनी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याबाबत माहिती सादर केली असून ती संकेतस्थळावर अपलोड केली आहे.’’
माहिती देण्यासाठी आणखी अवधी हवा
कोरोना संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेचा तपशील सादर करण्यासाठी आणखी वेळ दिला जावा अशी मागणी आज सरकारकडूनच सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली अन् न्यायालयाने देखील ती मान्य केली. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन’ या योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येईल. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ‘पश्चिम बंगाल आणि दिल्ली सरकार याबाबत सहकार्य करताना दिसत नाही. तसेच त्यांनी किती मुलांचे आई-वडील कोरोनामुळे मरण पावले याची माहितीही दिलेली नाही.’ न्या. एल.एन.राव आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी पार पडली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी केंद्र सरकारची बाजू मांडताना म्हणाल्या की,‘‘ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तिची रूपरेषा निश्चित करता यावी म्हणून आम्ही विविध मंत्रालयाच्या संपर्कात आहोत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.