जसजसा हिवाळा ऋतू जवळ येत आहे, तसतसे दाट धुकेही (Fog) पडू लागलेय.
दिल्ली : जसजसा हिवाळा ऋतू (Winter Season) जवळ येत आहे, तसतसे दाट धुकेही (Fog) पडू लागलेय. त्यामुळं सकाळी आणि संध्याकाळी दृश्यमानता कमी झालीय. यातच आता रस्ते अपघातही वाढ लागले आहेत. इस्टर्न पेरिफेरलवर (Eastern Peripheral) शुक्रवारी सकाळी सुमारे डझनभर वाहनांची धडक झाली. धुक्यामुळं हा अपघात झालाय. देशभरात धुक्यामुळं दरवर्षी सुमारे 33000 रस्ते अपघात होतात, यात सुमारे 13000 लोकांचा मृत्यू होतो.
देशात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे 9 टक्के मृत्यू हे धुक्यामुळं रस्ते अपघातात होतात. इस्टर्न पेरिफेरलमध्ये धुक्यामुळं शुक्रवारी डझनभर वाहने एकमेकांना आदळली. त्याचबरोबर महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, धुक्यात दृश्यमानता कमी झाल्यामुळं दरवर्षी रस्ते अपघात होतात. यामध्ये मृत्यूच्या तुलनेत जखमी झालेल्यांची संख्याही दुप्पट आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport) अहवालानुसार, एकूण रस्ते अपघातांपैकी 9 टक्के अपघात धुक्यामुळं होतात. जवळपास हाच आकडा पावसामुळं झालेल्या रस्ते अपघातांचा आहे. धुक्यामुळं होणाऱ्या रस्ते अपघातात मृतांची संख्या दुप्पट आहे. अहवालानुसार, सुमारे 25000 लोक जखमी झाले आहेत. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सतीश पांडे सांगतात, धुक्यात बहुतेक रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळं होतात. महामार्गांवर वाहनांचा वेग ताशी 100 आणि 120 किमी असल्यानं आणि त्यातच धुकं दाटल्यानं हे अपघात होतात, असं त्यांनी नमूद केलंय.
देशात रस्ते अपघात आणि मृतांची संख्या
वर्ष अपघात मृत्यू जखमी
2015 501423 146133 500279
2016 480652 150785 494624
2017 464910 147913 470975
2018 467044 151417 469418
2019 449002 151113 451361
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.