Loksabha 2024: 12 मुले, 9 मुली अन् 150 नातवंडांसह एकाच कुटुंबातील 350 लोक करणार मतदान; 'पॉवरफुल फॅमिली'ची निर्णायक मते

Family With 350 Voters: "मुलांनी उच्च शिक्षण घेतले पण त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. कुटुंबातील काही सदस्य बेंगळुरूला गेले आणि त्यांनी खाजगी नोकऱ्या शोधल्या. काही रोजंदारी मजूर म्हणून काम करत आहेत.
Family With 350 Voters In Assam
Family With 350 Voters In AssamEsakal
Updated on

Family With 350 Voters In Assam:

आसामच्या सोनितपूर लोकसभा मतदारसंघात एक असे कुटुंब आहे. ज्यांची मते एखादा उमेदवार निवडूण आणण्यात किंवा पराभूत करण्यात खूप निर्णायक भूमिका बाजावू शकतो.

दरम्यान, असेच एक कुटुंब आसामच्या सोनितपूर जिल्ह्यातील फुलोगुरी नेपाळी पाम येथील दिवंगत रॉन बहादूर थापा यांचे कुटुंब 19 एप्रिल रोजी लोकसभेच्या मतदानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आसाममध्ये मतदानाचा हक्क बजावणारे सर्वात मोठे कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबात सुमारे 350 मतदार आहेत. ते रंगपारा विधानसभा मतदारसंघ आणि सोनितपूर लोकसभा मतदारसंघांत येतात.

या कुटुंबातील सर्व सदस्य 19 एप्रिल रोजी सोनितपूर लोकसभा मतदारसंघात मतदान करणार आहेत.

रॉन बहादूर थापा यांच्या पश्चात 12 मुले आणि 9 मुली असा परिवार आहे. रॉन बहादूर यांच्या पश्चात 150 हून अधिक नातवंडे आहेत. त्यांना पाच बायका होत्या.

आता त्यांच्या कुटुंबातील सुमारे 350 सदस्य आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Family With 350 Voters In Assam
Loksabha 2024: निवडणूक काळात चार्टर्ड विमाने, हेलिकॉप्टरला डिमांड; जाणून घ्या तासाला किती रुपये देताहेत तुमचे आवडते पक्ष
माझे वडील 1964 मध्ये माझ्या आजोबांसोबत इथे आले आणि राज्यात स्थायिक झाले. माझ्या वडिलांना पाच बायका होत्या आणि मला 12 भाऊ आणि 9 बहिणी आहेत. त्यांना त्यांच्या मुलांकडून 56 नातवंडे झाली. मला मुलीच्या नातवंडांची माहिती नाही. या निवडणुकीत, नेपाळी पाममध्ये थापा कुटुंबातील सुमारे 350 सदस्य आहेत जे मतदानास पात्र आहेत.
तिल बहादूर थापा

सोनितपूर लोकसभा मतदारसंघातील फुलोगुरी नेपाळी पाम भागात एकाच पूर्वजाची जवळपास 300 कुटुंबे राहतात.

नेपाळी पाम गावाचे ग्रामप्रमुख आणि दिवंगत रॉन बहादूर यांचा मुलगा तिल बहादूर थापा यांनी एएनआयला सांगितले की त्यांच्या संपूर्ण कुटुंबात सुमारे 350 लोक मतदान करण्यास पात्र आहेत.

Family With 350 Voters In Assam
Lok Sabha 2024 : निवडणूक प्रचारात सोशल हॅन्डलर्सची एन्ट्री, ‘सोशल मीडिया’चा वाढला वापर; इन्फ्लूएन्सर्स बनले आधुनिक प्रचारदूत

मात्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ या कुटुंबाला मिळू शकला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

"आमच्या मुलांनी उच्च शिक्षण घेतले पण त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाहीत. आमच्या कुटुंबातील काही सदस्य बेंगळुरूला गेले आणि त्यांनी खाजगी नोकऱ्या शोधल्या. काही रोजंदारी मजूर म्हणून काम करत आहेत. मी 1989 पासून गावचा प्रधान म्हणून काम करत आहे. माला 8 मुले आणि 3 मुली आहेत," असे तिल बहादूर म्हणाले.

सोनितपूर लोकसभा मतदारसंघात 16.25 लाखांहून अधिक मतदार आहेत, ज्या 9 विधानसभा मतदारसंघ येतात.

आसाममधील 14 लोकसभा मतदारसंघांसाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल आणि 7 मे रोजी तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.