नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसानं कहर केला असून गेल्या दोन दिवसांत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. भूस्खलन आणि इतर पावसातील दुर्घटनांमुळं हे मृत्यू झाले आहेत. पावसानं हिमाचल प्रदेशला सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांना अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. (37 dead in rain rampage flood warning for Himachal today Uttarakhand on alert)
हिमाचल प्रदेशला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून पूर आणि भूस्खलनामुळं या ठिकाणी १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाब आणि हरयाणामध्ये ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर राजस्थानात ७ जणांचा आणि उत्तर प्रदेशात ३ जणांचा पावसाच्या विविध दुर्घटनांमध्ये मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)
उत्तर भारतातील अनेक नद्या ज्यामध्ये दिल्लीतील यमुना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्याचबरोबर अनेक शहरांमधील रस्ते आणि रहिवासी सोसायट्यांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं आहे. रविवारी या भागांमध्ये रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. (Marathi Tajya Batmya)
दरम्यान, पुरस्थितीमुळं ३९ एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यांपैकी १४ टीम पंजाबमध्ये, १२ टीम हिमाचल प्रदेशात तर ८ टीम उत्तराखंडआणि ५ टीम हरयाणात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच जम्मूमध्ये अमरनाथ यात्रेसाठी गेलेले सुमारे ७००० भाविक भगवतीनगर बेस कँपमध्ये अडकून पडले आहेत. तर ५००० हून अधिक भाविक चांदरकोट बेस इथं अडकून पडले आहेत. अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.