Heatstroke : बिहारमध्ये उष्माघाताने ३८ जणांचा मृत्यू तर मध्य प्रदेशात दोन चिमुकले दगावले

Heat
Heate sakal
Updated on

पाटणा : बिहारमध्ये उष्णतेची तीव्र लाट असून राज्यात विविध भागात दोन तीन दिवसांत ३८ जणांचा मृत्यू झाला. यापैकी आठ जणांचा काल मृत्यू झाला. सध्या असंख्य नागरिक रुग्णालयात दाखल असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राज्यातील शाळा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

उष्णतेमुळे पाचशेपेक्षा अधिक नागरिक बेशुद्ध पडल्याच्या घटना घडल्यामुळे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. येत्या चोवीस तासांत तापमानात फारसा बदल होणार नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. नागरिकांनी अकारण घराबाहेर पडू नये आणि सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत घरातच थांबावे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने म्हटले आहे.

Heat
T20 World Cup 2024 : यश तेव्हाच मिळेल जेव्हा खेळाडू एकत्रित... पाकिस्तानचा कोच गॅरी कर्स्टनलाच भरवसा नाही

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी सदर औरंगाबादच्या सदर रुग्णालयात तेरा जणांचा मृत्यू झाला. त्यांना उष्णतेचा त्रास होऊ लागल्याने दवाखान्यात दाखल केले होते. काहींचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला. याप्रमाणे कैमूर, गया, रोहतास येथे प्रत्येकी एका जणांचा मृत्यू झाला. बेगुसराय आणि बक्सर येथे प्रत्येकी दोन-दोन जणांचा तर बिहारशरीफ येथे एकाचा मृत्यू झाला. यात एका पोलिस कर्मचाऱ्याचा आणि महिलेचा समावेश आहे.

Heat
Latur News: अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर होतं घर... भीषण कार अपघातात प्राध्यापकाचा मृत्यू

दुसरीकडे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये उष्माघाताने 12 आणि 14 वर्षे वयोगटातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भावंडं असलेली ही दोन्ही मुलं आई आणि आजीसोबत औषध घेण्यासाठी गेली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.