J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

शुक्रवारी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे.
Accident
Accident sakal
Updated on

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली असून जवानांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळली असून यात 4 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर 31 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ही दुर्घटना घडली आहे. एएनआयनं ही माहिती दिली आहे.

बडगाम जिल्ह्यातील एका खोल दरीत बस कोसळली असून या बसमधून सुमारे ३५ बीएसएफचे जवान प्रवास करत होते. यांपैकी तीन जवान या अपघातात ठार झाले आहेत. तर ३२ जण जखमी झाले आहेत. ब्रेल वॉटरहेल भागात हा अपघात घडला आहे. J&K bus accident fell in George

Accident
सूरज चव्हाणला रील्सद्वारे फेमस करणारी कॅमेरावुमन कोण?

या जखमींपैकी ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या इलेक्शन ड्युटीवर चालले होते. या बसचा चालक असलेला स्थानिक नागरिक देखील या दुर्घटनेत जखमी झाला आहे. डोंगराळ भागातून ही बस जात असताना चालकानं नियंत्रण गमावल्यानं ही दुर्घटना घडली. Budgam accident 4 Jawan Killed

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.