4 Trekkers Dead: उत्तराखंडमध्ये 4 ट्रेकर्सचा दुर्दैवी मृत्यू, अडकलेल्या 13 जणांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम सुरू

4 Trekkers Dead: अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. मेहरबान सिंग बिश्त यांनी एसडीआरएफ मुख्यालयाला ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी तातडीने बचाव पथक पाठवण्याची विनंती केली. बचावकार्य सुरू आहे.
4 Trekkers Dead
4 Trekkers DeadEsakal
Updated on

उत्तराखंडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये धोकादायक साहसामुळे चार ट्रॅकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ट्रेकसाठी गेलेल्या ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सहस्त्रतालमध्ये ट्रेकसाठी गेलेले ट्रेकर वाईट हवामानामुळे अडकल्याची माहिती आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या ट्रेकर्सना वाचवण्यासाठी मोहीम करण्यात आली आहे.

तर, मुसळधार बर्फवृष्टीत अडकलेल्या 13 ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे. हा भीषण अपघात उत्तरकाशी जिल्ह्यात घडला.

4 Trekkers Dead
Loksabha Election 2024 Result : देशातील लक्षवेधी विजय, पराभव आणि असे आहे पक्षीय बलाबल; जाणून घ्या एका क्लिकवर

सहस्त्रताल ट्रेकसाठी गेलेल्यांना सदस्यीय ट्रेकिंग ग्रुपमधील चार सदस्य खराब हवामानामुळे रस्ता चुकले. उर्वरित सदस्य या उंच हिमालयीन ट्रेक मार्गात अडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. मेहरबान सिंग बिश्त यांनी एसडीआरएफ मुख्यालयाला ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी तातडीने बचाव पथक पाठवण्याची विनंती केली.

उत्तराखंडमध्ये धोकादायक साहसामुळे चार ट्रॅकर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, मुसळधार बर्फवृष्टीत अडकलेल्या 13 ट्रॅकर्सना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे.

4 Trekkers Dead
Jammu Kashmir Loksabha Election Result : जम्मू-काश्‍मीरच्या दोन्ही माजी मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का

स्थानिक पातळीवरून तातडीने बचाव पथके पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एसडीआरएफच्या कमांडंटला पत्र पाठवून कळवले आहे. अध्यक्ष, ट्रॅकिंग एजन्सी, उत्तरकाशी आणि मार्गदर्शक राजेश ठाकूर यांनी मंगळवारी संध्याकाळी प्रशासनाला कळवले की, हिमालयन व्ह्यू ट्रॅकिंग एजन्सी, मणेरी मार्फत मल्ला-सिल्लावर -कुष्कल्याण-सहस्त्रताल ट्रॅकसाठी 22 सदस्यांची टीम गेली आहे.

ज्यामध्ये कर्नाटकातील 18 सदस्य, महाराष्ट्रातील एक सदस्य आणि तीन स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश होता. 29 मे रोजी या टीमला सहस्त्रतालच्या ट्रेकिंग मोहिमेवर पाठवण्यात आले. ही ट्रॅकिंग टीम ७ जूनपर्यंत परतणार होती.

4 Trekkers Dead
World Environment Day 2024 : ‘कोचिंग क्लासमधून मिळणाऱ्या फीच्या पैशातून झाडे लावायला सुरूवात केली’ वाचा ‘झाड प्रेमी’ महिलेची यशोगाथा

दरम्यान, शेवटच्या दिवशी शेवटच्या शिबिरातून सहस्त्रतालला पोहोचत असतानाच खराब हवामानामुळे संघाचा रस्ता चुकला. संबंधित ट्रॅकिंग एजन्सीने तपासाअंती या टीममधील चार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अडकलेल्या इतर 13 सदस्यांना तातडीने बाहेर काढण्याची विनंती करण्यात आली आहे.

एसडीआरएफ आणि वन विभागाच्या स्थानिक पथकांना घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यास सांगण्यात आले आहे. ट्रेकिंग असोसिएशननेही सिल्ला गावातील लोकांना घटनास्थळी पाठवल्याची माहिती दिली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने टिहरी जिल्ह्यातील घणसाली परिसरातून वनविभागाची टीम पाठवण्याची विनंतीही केली आहे.

4 Trekkers Dead
Loksabha Election Result : मोदींच्या २० सभांनंतरही राज्यात अपेक्षित यश नाही

जिल्हा दंडाधिकारी म्हणाले की सहस्त्रताल सुमारे 4100-4400 मीटर उंचीवर आहे आणि घटनास्थळ उत्तरकाशी जिल्हा आणि टिहरी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. संघाच्या त्वरीत बचावासाठी उत्तरकाशी आणि घणसाली टिहरी येथून दोन्ही बाजूंच्या बचाव पथकांना तातडीने हिमालयात पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com