नवी दिल्ली : कॅन्सर हा रोग भयानक मानला जातो. या रोगावर रामबाण असा उपाय नसल्याने तो चिंताजनक मानला जातो. देशात कॅन्सरचे किती रुग्ण आहेत, याबाबतची माहिती आज संसदेमध्ये देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया (Mansukh Mandaviya) यांनी याबाबतची माहिती संसदेसमोर सादर केली आहे. (cancer cases)
देशात २०१८ ते २०२० दरम्यान कॅन्सरच्या ४० लाख पेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. त्यातील २२ लाखापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाला, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत रुग्णांचा आकडा अनुक्रमे १३,९२,१७९; १३,५८,४१५ आणि १३,२५,२३२; तर मृतांचा ७,७०,२३०; ७,५१,५१७ आणि ७,३३,१३९ इतका होता. एकूण आकडे अनुक्रमे ४० लाख ७५ हजार ८२६ आणि २२ लाख ५४ हजार ८८६ इतके होते. (Lok Sabha)
हा आजार होण्यामागची कारणे अनेक असल्याचं सांगून आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, वृद्ध लोकसंख्या, बैठी जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, दारू, अस्वास्थ्यकर आहार आणि वायू प्रदूषण ही त्याची प्राथमिक कारणे आहेत.
कोरोना काळात 25 हजार आत्महत्त्या
दुसरीकडे, कोरोना काळात बेरोजगारीला कंटाळून किंवा कर्जबाजारीला कंटाळून जवळपास 25 हजार भारतीयांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे.
राय म्हणाले की, ही आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) द्वारे प्रदान केलेल्या डेटावर आधारित असून, 2018-2020 मध्ये बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेकांना आयुष्य संपल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2020 मध्ये सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. 25 हजारांपैकी 16 हजार आत्महत्या या बेरोजगारी या एकाच कारणामुळे झाल्या असल्याचे सांगण्यात आले आहे. (NCRB Report About suicide During Corona Period)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.