मोदींनी घडवला इतिहास! निवडणूक प्रचारासाठी केला तब्बल 'एवढ्या' किमीचा 'रोड शो'

Narendra Modi
Narendra Modi
Updated on

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये आयोजित आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या मेगा रोड शोमध्ये सहभाग घेऊन इतिहास घडवला. भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एका नेत्याने केलेला हा सर्वात मोठा रोड शो ठरला असून मोदींनी एक आगळावेगळा विक्रम केला आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. (PM modi news in Marathi)

Narendra Modi
Raj Thackeray on MNS Factionalism: 'मनसे'च्या गटबाजीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...

पंतप्रधान मोदींनी ज्या भागातून रोड शो केला, त्या भागात मतदानासाठी आथा फक्त चार दिवस शिल्लक आहेत. गुजरात निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. कारण पक्षाचे दोन्ही प्रमुख नेते याच राज्यातील आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांना सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

साबरमती एक्सप्रेमध्ये लागलेल्या आगीनंतर उसळलेल्या गोधऱा दंगलीचं केंद्रस्थान ठरलेल्या नरोदा गावातून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली. भूतकाळातील घटनांना मागे सोडण्याचा संदेश म्हणून या रोड शोकडे पाहिलं जात आहे.

Narendra Modi
Gujarat Election : काँग्रेसच्याच काळात वाढली गरिबी, मोदींचा हल्लाबोल

ठक्करबापानगर, बापूनगर, निकोल, आमराईवाडी, मणीनगर, दानीलींबाडा, जमालपूर खाडिया, एलिसब्रीज, वेजलपूर, घाटलोडिया, नारनपूर आणि साबरमती अशा १६ मतदार संघातून हा रोड शो गांधीनगर दक्षिणेला जाऊन तिथेच संपला. एकूण ५० किमी रोड शोसाठी तब्बल ३.५ तास लागले.

हा रोड शो भाजपचा या निवडणुकीतील सर्वात मोठा कार्यक्रम ठरला आहे. यावेळी हजारो लोक पक्षाचे झेंडे फडकवत ढोलताशांसह पंचप्रधान मोदींचं स्वागत करत होते. यावेळी पंतप्रधान मोदी देखील एसयूव्हीमध्ये उभे राहून रस्त्यावरील गर्दीला अभिवादन करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.