उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) विधान परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. यामुळे येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विजयासाठी नागरिकांना प्रलोभन दिलं जात आहे. निवडणुकीपूर्वी योगी सरकारने (Yogi Government) शेतकऱ्यांना मोठी भेट देत वीज बिलात ५० टक्के सूट (50 percent discount on electricity bill for farmers) देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची सोय आणि समृद्धी लक्षात घेऊन कूपनलिका वीज दरात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय (50 percent discount on electricity bill for farmers) घेण्यात आला आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे ट्विटद्वारे सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागातील मीटरच्या जोडणीवर प्रति युनिट २ रुपये ऐवजी फक्त १ रुपये प्रति युनिट भरावे लागतील. या जोडणीसाठी आतापर्यंत ७० रुपये प्रति हॉर्सपॉवर निश्चित शुल्क आकारले जात होते. आता हा दर ३५ रुपये प्रति अश्वशक्ती इतका करण्यात आला आहे.
गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Government) यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वरोजगार संगम कार्यक्रमांतर्गत ५,०६,९९५ लाभार्थ्यांना ४,३१४ कोटींचे कर्ज वाटप केले. सरकारच्या कामगिरीविषयी सांगताना तीन महिन्यांपूर्वी दिलेले वचन आज पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. मैनपुरी येथील सैनिक शाळेचे नाव देशाचे पहिले मुख्य संरक्षण प्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.