‘...तर ५० टक्के हिंदू इस्लाम स्वीकारतील; अस्तित्वासाठी शस्त्र उचला’

महंत नरसिंहानंद
महंत नरसिंहानंदमहंत नरसिंहानंद
Updated on

वादग्रस्त विधाने आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले डासना देवी मंदिराचे महंत यती नरसिंहानंद सरस्वती यांनी रविवारी आणखी एक टिप्पणी करून वाद निर्माण केला आहे. एखादा मुस्लिम भारताचा पंतप्रधान झाला तर २० वर्षांत ५० टक्के हिंदू (Hindu) इस्लाम स्वीकारतील, असे ते म्हणाले. दिल्लीत आयोजित ‘हिंदू महापंचायत’ला संबोधित करताना त्यांनी हिंदूंना अस्तित्वासाठी लढण्यासाठी शस्त्र उचलण्याचे आवाहन केले.

बुरारी मैदानावर हिंदू (Hindu) महापंचायत आयोजित केली होती. रविवारच्या कार्यक्रमाला अनेक हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. नरसिंहानंद हे हरिद्वारमध्ये दिलेल्या द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर आहेत. २०२९, २०३४ किंवा २०३९ मध्ये एक मुस्लिमच पंतप्रधान होईल. मुस्लिम (Islam) पंतप्रधान झाल्यावर ५० टक्के हिंदू धर्मांतर करतील. ४० टक्के मारले जातील आणि उर्वरित १० टक्के शिबिरांमध्ये किंवा इतर देशांत पुढील २० वर्षे निर्वासित म्हणून राहतील, असेही महंत नरसिंहानंद म्हणाले.

महंत नरसिंहानंद
उल्कापात की उपग्रहाचे तुकडे? चंद्रपूर जिल्ह्यात सापडले अवशेष

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या महापंचायतीच्या व्हिडिओमध्ये नरसिंहानंद हेच हिंदूंचे (Hindu) भविष्य असेल, असे म्हणताना दिसत आहेत. पीटीआय व्हिडिओची सत्यता पडताळू शकली नाही. कार्यक्रमाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या दिल्लीतील काही पत्रकारांना तिथे मारहाण केल्याचा आरोप आहे. दोन तरुण मुस्लिम मीडिया कर्मचाऱ्यांवर हिंदू जमावाने हल्ला केला आणि त्यांना ताब्यात घेतले, असे पत्रकाराने ट्विट शेअर करीत आरोप केला. याबाबत पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) उषा रंगनानी यांनी ट्विटरवर सांगितले की, कोणालाही ताब्यात घेतले नाही.

आवश्यक कारवाई केली जाईल

काही पत्रकार स्वेच्छेने गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी तैनात असलेल्या पीसीआर व्हॅनमध्ये चढले आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी पोलिस ठाण्यात जाण्याचा पर्याय निवडला. चुकीची माहिती पसरवल्याने अशा व्यक्तींविरुद्ध आवश्यक कारवाई केली जाईल, असे उषा रंगनानी यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.