Uttarakhand Flood : उत्तराखंडमध्ये ५० पर्यटकांची सुटका; हिमाचलला ऑरेंज अलर्ट’

उत्तर भारतात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता
50 tourists stranded in uttarakhand tehri due to flooding rescued safely monsoon news flood news
50 tourists stranded in uttarakhand tehri due to flooding rescued safely monsoon news flood newssakal
Updated on

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यात मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे अडकून पडलेल्या जवळपास ५० पर्यटकांची सुरक्षित सुटका करण्यात आली. उत्तराखंडमधील धानोलीचे उपविभागीय दंडाधिकारी लक्ष्मीराज चौहान यांनी सांगितले,

की सितापूर परिसरात मौंडखाला या ओढ्याची पाणीपातळी टेकड्यांच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक वाढली. त्यामुळे ओढ्यावर उभारलेल्या तात्पुरत्या पुलाचे नुकसान झाले. त्यामुळे, हे पर्यटक अडकून पडले.

मात्र, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) घटनास्थळी ताबडतोब धाव घेत या पर्यटकांची सुटका केली. दरम्यान, आणखी पावसाची शक्यता लक्षात घेऊन लोकांनी तलाव तसेच इतर नदी, ओढा आदी ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उत्तर भारतात पावसाचा जोर वाढणार

उत्तर भारतात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने मंगळवारपासून (ता.२५) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. उत्तराखंड, दिल्ली, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थानात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वायव्य भारतात एक जूनपासून सरासरीपेक्षा ४० टक्के अधिक पाऊस झाला आहे. केवळ पूर्व उत्तर प्रदेशात २९ टक्के कमी पाऊस झाला आहे., दरम्यान, पंजाबच्या काही शहरात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. जालंधर शहरात वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र होते.

हिमाचलला ऑरेंज अलर्ट’

हवामान खात्याने हिमाचल प्रदेशला २६ ते २८ जुलैदरम्यान तीन दिवसांसाठी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. अतिवृष्टीनंतर गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आता दोन दिवसांनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.