नवी दिल्ली : आसाम आणि मेघालयमध्ये सोमवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मेघालयच्या उत्तर गारो हिल्समध्ये 10 किलोमीटर खोलीवर होता.
आसाम आणि मेघालय व्यतिरिक्त त्रिपुरामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अद्याप जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
या व्यतिरिक्त उत्तर बंगालच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सिलीगुडी आणि कूचबिहारमध्ये भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सोमवारी संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 5.2 इतकी होती, जी धोकादायक पातळी मानली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.