Heat Wave in UP : युपीत मोठी दुर्घटना! उष्मघातामुळे ७२ तासांत ५४ जणांचा मृत्यू

Heat Wave
Heat Waveesakal
Updated on

वाढत्या तापमानामुळे मागील तिन दिवसांपासून उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा रुग्णालयात ५४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल ४०० जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूची कारणे वेगवेगळी आहेत, मात्र वाढळेली उष्णता हे देखील एक कारण आहे. तसेच भीषण उष्णतेमुळ रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढतच जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रंचड उष्णता वाढली आहे, बऱ्याच भागात तापमान ४० डिग्रीच्या पुढे जाताना दिसून येत आहे.

मृतांची अचानक वाढलेली संख्या आणि रुग्णांना ताप, श्वास घेताना त्रास होणे आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. सध्या आरोग्य विभाग अॅक्शन मोडमध्य आले आहे. बलिया येथील रुग्णालय अधिक्षक एस के यादव यांनी सांगितले की १५ जूनला २३ तर त्याच्या दुसऱ्या दिवशी ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Heat Wave
Ketaki Chitale on Adipurush : केतकीकडून रावणाचा 'श्री रावण' असा उल्लेख; नव्या वादाला तोंड फोडलं!

आजमगढ सर्कलचे अतिरिक्त स्वास्थ निदेशक डॉ. बीपी तिवारी यांनी सांगितलं की लखनऊ येथून एक टीम चौकशीसाठी पाठवण्यात आली आहे. ही टीम हा माहिती नसलेला आजार आहे का याबद्दल माहिती घेईल. जास्त उष्णता वाढल्याने सर्दीत श्वसनाचा त्रास असलेले रुग्ण , मधुमेहाचे आणि ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांना धोका वाढतो. तसेच तापमानाचा पारा वाढल्याने देखील अशा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो असा अंदाड देखील डॉ. तिवारी यांनी व्यक्त केला.

दरम्यान जिल्हा रुग्णालयात गर्दी वाढत चालली असून रुग्णांना स्ट्रेचर्स देखील मिळत नाहीत, अनेक रुग्णांना खांद्यावर इमर्जन्सी वार्डमध्ये नेलं जात आहे.

Heat Wave
Aurangzeb : 'औरंगजेबाने 50 वर्षे राज्य केलं ते कोणाला मिटवता येणार नाही'; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.