अग्निपथ योजना : IAF मध्ये भरतीसाठी तरूणांचा मोठा उत्साह 56,960 अर्ज दाखल

Air Force
Air Force esakal
Updated on

नवी दिल्ली : एकीकडे केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme ) विरोध होत असताना भारतीय हवाईदलात (Indian Air force ) भरती होण्यासाठी तरूणांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे. अग्निपथ योजनेतंर्गत या विभागात भरती होण्यासाठी केवळ तीन दिवसात 56 हजार 960 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. देशभरातील निदर्शनांनंतर शुक्रवारपासून भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. भारतीय हवाई दलाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. (Agnipath Recruitment Latest News In Marathi )

अग्निपथ योजनेअंतर्गत हवाई दलाकडून 24 जून 2022 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. त्यानुसार हवाई दलात नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै आहे. भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या युवकांना careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन हवाई दलाकडून करण्यात आले आहे.

अग्निपथ भरती योजना

या योजने’ अंतर्गत तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे. या योजनेमुळे तरुणांना शॉर्ट टर्मसाठी सैन्यात भरती मिळणार आहे. तरुणांना रोजगार मिळावा आणि देशसेवा व्हावी, या हेतूने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे. या जवानांना अग्नीवीर संबोधले जाणार. तर एकूण ५० हजार जागा भरण्यात येईल.

Air Force
Maharashtra Politics : बंड आमदारांचा गुवाहाटीतील मुक्काम वाढणार; सूत्रांची माहिती

योजनेचा कालावधी

या योजनेचा कालावधी चार वर्ष राहील. या योजनेअंतर्गत चार वर्षे तरुण सैन्यात काम करणार त्यानंतर जास्तीत जवानांना सेवेतून मुक्त केले जाईल. या भरतीमध्ये 20 टक्के सैनिकांना चार वर्षांनंतर सैन्यभरती झाली तर त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळणार. चार वर्षानंतर सेवेतून मुक्त झालेल्या सैनिकांना पेंशन लागू केले जाईल.

वयोमर्यादा आणि अटी

सध्या या योजनेत सहभागी होणाऱ्यांची वयोमर्यादा ३२ वर्षे असेल त्यानंतर पुढील सहा-सात वर्षानंतर ही वयोमर्यादा २६ पर्यंत खाली जाणार. या योजनेंतर्गत जे तरुण भरती होणार आहेत त्यांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असणं गरजेचं असेल. याशिवाय १० आणि १२ वी उत्तीर्ण असणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

Air Force
आता घरं रिकामी करा अन्...; आव्हाडांचं BDD चाळीबाबत ट्वीट

वेतन

अग्निवीरांना चांगल्या वेतनाची व्यवस्था केली आहे. जीडीपीमध्येही त्यामुळे योगदान होईल पहिल्या वर्षी या जवानांना ४.७६ लाखांचे पॅकेज मिळेल तर चौथ्या वर्षी यांचे पॅकेज हे ६.९३ लाखापर्यंत पोहचणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.