5G in India: आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु

सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा मिळणार
5G in India: आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु
Updated on

आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5 जी इंटरनेट सेवा लाँच करण्यात येणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर फाईव्ह-जी सेवा लाँच करणार आहेत. भारतासाठी हा एक विशेष क्षण असेल आणि देश तंत्रज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करेल.

सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये ही सेवा मिळणार आहे. या सेवेने देश आता सुपरफास्ट होणार आहे. भारतावर 5G चा एकूण आर्थिक प्रभाव 2035 पर्यंत 450 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 4G च्या तुलनेत, 5G नेटवर्क अनेक पटींनी जलद गती देते.

5G in India: आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु
5G म्हणजे काय? आणि हे तंत्रज्ञान भारतात कसे काम करेल? जाणून घ्या

सुरवतीच्या टप्प्यात 13 शहरांमध्ये पहिली 5G सेवा सुरू करण्यात येत आहे. ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर 5G सेवेचा देशभरात झपाट्याने विस्तार केला जाईल.

5G in India: आता वाढणार इंटरनेटचा वेग, आजपासून देशात 5G इंटरनेट सेवा सुरु
पुणे होणार सुपरफास्ट; 5G साठी वेगात प्रक्रिया होणार

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या कंपन्या स्पर्धेत आहेत. आता कोणती कंपनी 5G इंटरनेटची सुरुवात करतेय, हे पाहावं लागेल. 5G इंटरनेट सेवा सुरु होत आहे याच पार्श्वभूमीवर अनेक मोबाईल कंपन्यांनी आधापासून 5जी मोबाईलवर लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली आहे. सध्या बाजारात अनेक 5G मोबाईल उपलब्ध आहेत. तर काही कंपन्या सर्वात स्वस्त 5G मोबाईल देत आहेत. रिलायन्स जियो कंपनीने नुकताच जिओ 5G फोन लाँच केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.