5G Launch : डेटा स्वस्तच झाला, सध्या किती पैसे वाचतात? PM मोदींनी सांगितला हिशोब

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजपासून देशात 5G सेवेला झाला प्रारंभ
India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1
India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1
Updated on

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत शनिवारी (दि.1) 5G सेवा लॉन्च केली. यावेळी मोदींनी भारतात इंटरनेट क्षेत्रात कशी क्रांती झाली तसेच डेटा कसा स्वस्त होत गेला हे देखील सांगितलं. यासाठी त्यांनी सगळाच हिशोबचं समोर ठेवला. इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या सत्रामध्ये पंतप्रधान बोलत होते.

India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1
Dasara Melava! गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून थेट उद्धव ठाकरेंच्याच आवाजाचा वापर

मोदी म्हणाले, "पूर्वी भारतातल्या नागरिकांना एक जीबी डेटासाठी 300 रुपये मोजावे लागत होते. आज तेवढाच डेटा केवळ 10 रुपयांना मिळतोय, म्हणजेच साधारण एक माणूस महिन्याकाठी 14 जीबी डेटा खर्च करायचा. त्यामुळे त्याला महिन्याला 4 हजार 200 रुपये खर्च करावे लागत होते. परंतू आता केवळ 150 रुपयांमध्ये तेवढाच डेटा मिळतोय. त्यामुळे सामान्यांचे महिन्याकाठी 4,000 रुपये वाचतात"

India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1
Pune News: चांदणी चौक परिसरात कलम १४४ लागू; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आज झपाट्याने बदलत चाललेल्या जगामध्ये भारताला सर्वोच्च स्थानी जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. भारतीय त्याबाबतील तडजोड करणार नाहीत. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व भारतच करेल, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

India 5G Launch prime minister narendra modi will launch 5g service on october 1
मोदींपाठोपाठ CM योगीही करणार न्यूयॉर्क-बँकॉकमध्ये 'रोड शो'; युपी सरकारचं नियोजन

दरम्यान, यावेळी पंतप्रधानांना जिओ, एअरटेल या कंपन्यांनी 5Gचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी मोदींनी जिओ ग्लास आणि 5G उपकरणांची पाहाणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.