Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला; जाळपोळीत 6 ठार, आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू

मणिपुरात मे महिन्यापासून सुरू आहे जातीय हिंसाचार
Manipur Violence
Manipur Violenceesakal
Updated on
Summary

रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार सुरू होता. क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील (Meitei community) तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली.

Manipur Violence : मणिपुरात मे महिन्यापासून सुरू असलेला जातीय हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची आग भडकली आहे. मणिपुरात गेल्या 24 तासांत अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. सध्या इथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, मृतांचा आकडा 160 आहे, परंतु सततच्या हिंसाचाराकडं पाहता या उपद्रवात किती लोक मारले गेले याची मोजदाद झाली नाहीये. काल (शनिवार) IRF जवानासह किमान 6 जणांचा मृत्यू झाला.

Manipur Violence
Rahul Gandhi यांचा संसदेत परतण्याचा मार्ग मोकळा; लोकसभेत मोदी सरकार विरूद्धच्या 'अविश्वासदर्शक' ठरावात घेणार भाग?

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार सुरू होता. क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील (Meitei community) तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहांचीही नासधूस केली. काही तासांनंतर चुराचांदपूर जिल्ह्यात कुकी समाजातील (Kuki community) दोन लोकांची हत्या करण्यात आली. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध घेण्यात येत आहे.

Manipur Violence
INDIA Alliance : 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर; आता 25-26 ऑगस्ट नाही, तर 'या' तारखेला होणार बैठक!

राज्यात 3 मेपासून सुरू आहे हिंसाचार

आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सचा (Manipur Rifles) एक जवानही शहीद झाला, असं अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितलं. एवढंच नाही तर जमावानं बिष्णुपूरमधील कीरेनफाबी आणि थंगलावई येथील पोलिस ठाण्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा लुटला.

जमावानं 235 असॉल्ट रायफल, 21 सब-मशीन गन, 16 पिस्तूल, 9,000 गोळ्या आणि 124 हँडग्रेनेडसह शस्त्रं आणि दारूगोळा लुटला. दरम्यान, 3 ऑगस्ट रोजी कुकी गट (Kuki community), इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम (ITLF) ने हिंसाचारात बळी पडलेल्या 35 जणांच्या मृतदेहांचे सामूहिक दफन करण्याची घोषणा केल्यानंतर या भागात तणाव वाढला.

Manipur Violence
NCP Crisis : 15 ऑगस्टनंतर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप! राष्ट्रवादीचा मोठा गट अजितदादांसोबत जाणार? जयंत पाटलांचंही नाव चर्चेत

युम्नाम पिशाक मेईतेई (वय ६७) आणि त्यांचा मुलगा युम्नाम प्रेमकुमार मेईतेई अशी मृतांची नावं आहेत. याशिवाय त्यांचा शेजारी युम्नाम जितेन मेईतेई याचीही हत्या करण्यात आली होती. दरम्यान, भारतीय लष्कराचा दावा आहे की त्यांनी मोंगचम परिसरात कुकी समुदायाच्या हल्लेखोराला पकडलं आहे. त्याच्याकडून शस्त्रं आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.