Delhi Farmers Protest 2.0: सहा महिन्यांचे राशन, गुरुद्वारा-आश्रममध्ये राहण्याची सोय; शेतकऱ्यांच्या तयारीचा 'गुप्तचर अहवाल' काय सांगतो?

सोमवारी रात्री केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी पाच तास चर्चा केली. पण, काही तोडगा निघालेला नाही. ( intelligence report on the delhi farmers protest)
Delhi Farmers Protest 2.0
Delhi Farmers Protest 2.0
Updated on

नवी दिल्ली- शेतकरी आज दिल्लीत दाखल होणार आहेत. शेतकऱ्यांचा 'दिल्ली मोर्चा' रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सोमवारी रात्री केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी पाच तास चर्चा केली. पण, काही तोडगा निघालेला नाही. गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांनी 'आंदोलन २.०'ची पूर्ण तयारी केली आहे. शेतकऱ्यांनी सहा महिन्यांचे राशन सोबत घेतले आहे. तसेत गुरुद्वारा, आश्रम याठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. पण, शेतकरी गावातल्या भागातून आणि वाहतूक नसलेल्या रस्त्याच्या परिसरातून दिल्लीच्या सीमेत प्रवेश करतील. शेतकऱ्यांमध्ये जास्त करुन उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यातील शेतकरी आहेत. जवळपास २०० शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या या नव्या आंदोलनाने मागील २०२० मधील आंदोलनाची लोकांना आठवण होत आहे.

Delhi Farmers Protest 2.0
Delhi Farmers Protest: चर्चा निष्फळ! शेतकऱ्यांना रोखण्यासाठी तटबंदी; सोनीपतमध्ये डिझेल-पेट्रोलच्या विक्रीवर निर्बंध, जाणून घ्या महत्त्वाच्या घडामोडी

शेतकरी पूर्ण तयारीनिशी

शेतकऱ्यांच्या पिकाला स्वामिनाथन अहवालाच्या शिफारशीनुसार एमएसपीनुसार minimum support price (MSP) दर द्यावेत ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. गुप्तचर अहवालानुसार, एकट्या पंजाबमधून १५०० ट्रॅक्टर आणि ५०० वाहने घेऊन शेतकरी दिल्लीत धडकणार आहेत. यामध्ये सहा महिन्यांचे राशन, अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीर्घ आंदोलनाची तयारी केल्याचं स्पष्ट दिसतंय.

शेतकरी प्रामुख्याने शंभू बॉर्डर (अंबाला), खानोरी (जिंद), दाबवली (सिरसा) या ठिकाणांहून दिल्लीत दाखल होतील. आंदोलनाच्या आधी किसान मजदूर संघर्ष कमिटीच्या नेत्यांनी केरळ, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि तामिळनाडूमध्ये जाऊन शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरमध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यात राहता यावे अशी सोय करण्यात आली आहे.

Delhi Farmers Protest 2.0
Farmers 'Delhi Chalo' March: दिल्लीचं जनजीवन विस्कळीत होतंय, शेतकऱ्यांना रोखा; सुमोटोसाठी सरन्यायाधिशांना पत्र

दिल्लीचा अभेद्य किल्ला

अहवालामध्ये असंही सांगण्यात आलंय की, शेतकरी छोट्या-छोट्या गटाने दिल्तीमध्ये दाखल होतील. ते गुरुद्वारा, धर्मशाळा, आश्रम, गेस्ट हाऊनमध्ये थांबतील आणि आंदोलनात सहभागी होतील. मागील आंदोलनात शेतकरी अनेक महिने दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून होते. तशीच तयारी शेतकऱ्यांकडून आताही करण्यात येत आहे. केंद्र सरकारने दिल्लीची नाकेबंदी केली आहे. रस्ते अडवण्यात आले आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा निर्धार केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.