भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू

भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू
Updated on

नवी दिल्ली : भारतामध्ये असुरक्षित गर्भपातामुळे मरणाऱ्या महिलांचे प्रमाण हे माता मृत्यूंच्या एकूण कारणांपैकी तिसरं मुख्य कारण ठरतं. इतकंच नव्हे तर दर दिवशी जवळपास आठ महिला या असुरक्षित गर्भपाताच्या कारणास्तव मृत्यूमुखी पडतात. याबाबतची माहिती युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (UNFPA) स्टेट ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2022 मध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 2007 ते 2011 च्या दरम्यान, तब्बल 67 टक्के भारतातील गर्भपात हे असुरक्षित गर्भपात असल्याचं सांगण्यात आलंय.

भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू
2024 ची निवडणूक प्रशांत किशोर काँग्रेसला जिंकून देणार?

याबाबतचा रिपोर्ट बुधवारी प्रसिद्ध झाला असून "Seeing the Unseen: the case for action in the neglected crisis of unintended pregnancy" असं याचं नाव आहे. या रिपोर्टनुसार, दरवर्षी साधाराण 121 दशलक्ष गर्भधारणा या अनपेक्षितपणे होतात. म्हणजे दिवसाला सरासरी 331,000 इतक्या होतात. म्हणजेच सातपैकी एक अनपेक्षित गर्भधारणा ही भारतात होते, असं हा रिपोर्ट सांगतो. अनपेक्षित गर्भधारणा आणि त्यानंतर होणारे गर्भपात यांचा देशाच्या सर्वांगीण विकासाशी देखील घनिष्ट संबंध आहे. जसजसे शिक्षण आणि उत्पन्नाची पातळी वाढते, तसंतसे अनपेक्षित गर्भधारणेचे प्रमाण देखील कमी होते, असं या अहवालात म्हटलंय.

भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू
Petrol-Diesel दरवाढीबद्दल प्रश्न विचारताच बाबा राम देव संतापले

UNFPA ने जगातील अनपेक्षित गर्भधारणेची ही संख्या पाहता म्हटलंय की, "मूलभूत मानवी हक्क राखण्यात आलेलं हे जागतिक अपयश आहे. या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर अंदाजे 257 दशलक्ष स्त्रिया या आपली अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षित तसेच आधुनिक गर्भनिरोधक पद्धती वापरत नाहीत. तर त्यापैकी 172 दशलक्ष स्त्रिया कोणतीच पद्धत वापरत नाहीत, असंही म्हटलंय. एक हजार महिलांमध्ये साधारण 64 महिला या अनपेक्षितपणे गर्भार राहतात म्हणजेच जगातील अंदाजे 6 टक्के महिलांना दरवर्षी अनपेक्षित गर्भधारणा होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.