Viral Video: ट्रकच्या धडकेत 'छोटा हाती' पलटला अन् बाहेर पडले 7 कोटींचे घबाड

Cash Seized In Andhra Pradesh: या 'छोटा हाती'मधून रोकड असलेले 7 कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
7 Crore Cash Found In Andhra Pradesh
7 Crore Cash Found In Andhra PradeshEsakal
Updated on

मध्ये प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात सात बॉक्समध्ये ठेवलेली ७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे.

नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रकने धडक दिल्यानंतर छोटा हाती पलटी झाला. त्यानंतर या 'छोटा हाती'मधून रोकड असलेले 7 कार्डबोर्डचे बॉक्स नेले जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

हा छोटा हाती विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने जात होती. पलटी झालेल्या छोटा हातीचा चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

7 Crore Cash Found In Andhra Pradesh
PM Modi: 'काँग्रेस देशाला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवत आहे..', PM मोदी यांचे टीकास्त्र

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील एका चेकपोस्टवर ट्रकमधून 8 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली होती. रोकड जप्त केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही रोकड पाईपने भरलेल्या ट्रकच्या एका गुप्त डब्यात लपवून ठेवली होती.

7 Crore Cash Found In Andhra Pradesh
Priyanka Gandhi: "पंतप्रधान प्रचाराला आले की, लहान मुलासारखे रडतात," प्रियंका गांधींचा नंदुरबारमध्ये हल्लाबोल

दरम्यान सध्या देशभरात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुका 7 टप्प्यात होणार असून, याचे तीन टप्पे पार पडले आहेत. तर चौथ्या टप्पासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.

आंध्र प्रदेशात यंदा लोकसभा निवडणुकांसह विधानसभेच्या निवडणुकाही एकत्र होणार आहे. यासाठी 13 मे ला मतदान होणार आहे.

तेलंगनामध्ये लोकसभाच्या 25 जागा आहेत. तर विधानसभेच्या 175 जागा आहे. तेथे सध्या मुख्यमंत्री जनगमोहन रेड्डी यांच्या वायएसआरसीपी पक्षाची सत्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.