Arvind Kejriwal : आता केजरीवालांच्या अडचणी वाढणार; सुकेशचा 700 पेजच्या 'चॅट'बाबत मोठा गौप्यस्फोट

सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh Chandrasekhar) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय.
Sukesh Chandrasekhar
Sukesh Chandrasekharesakal
Updated on
Summary

केजरीवालांवर 'दक्षिण ग्रुप' आणि बीआरएस पक्षाशी (BRS Party) संगनमत केल्याचा आरोप त्यानं केलाय.

भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील (Money laundering Case) आरोपी सुकेश चंद्रशेखरनं (Sukesh Chandrasekhar) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय.

केजरीवालांवर 'दक्षिण ग्रुप' आणि बीआरएस पक्षाशी (BRS Party) संगनमत केल्याचा आरोप त्यानं केलाय. सुकेशनं त्याचे आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख केजरीवाल यांच्यातील 700 चॅटचे स्क्रीनशॉट असल्याचा दावा केलाय.

सुकेश म्हणाला, 'या चॅटमध्ये केजरीवाल यांनी बीआरएस कार्यालयात 15 कोटी रुपये वितरित करण्याच्या सूचना आणि बीआरएस नेत्याकडून स्वीकारल्याच्या सूचना देखील होत्या. केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यासह आप नेत्यांनी तसे निर्देश दिले होते.'

Sukesh Chandrasekhar
China Taiwan Conflict : चीन-तैवान संघर्ष पेटला! 40 चिनी लढाऊ विमानं घुसली तैवानच्या हद्दीत

सुकेश चंद्रशेखरनं एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटलंय, 'चॅटमध्ये 'दक्षिण ग्रुप' आणि बीआरएसच्या नेत्याशी तुमचा (केजरीवाल) संबंध स्पष्टपणे उघड होईल. तसंच, चॅटमध्ये BRS चे नेते AP ऊर्फ अरुण पिल्लई यांना 15 कोटी @ '15 किलो तूप' देण्याची सूचना कशी दिली? असंही नमूद आहे. मी तुम्हा सर्वांसह नार्को, पॉलीग्राफ किंवा इतर कोणतीही चाचणी करण्यास तयार आहे. त्यानंतर कायदा ठरवू द्या.. मी फक्त बोलणार नाही, तर प्रत्येक विधानाला उत्तर देणार आहे, असं सुकेशनं स्पष्ट केलंय.

Sukesh Chandrasekhar
VIDEO : भाजपमध्ये गेल्याची एवढी मोठी शिक्षा? तीन महिलांनी घातलं 'दंडवत' अन् 'या' पक्षात केला प्रवेश

सुकेशनं पुढं दावा केलाय की, माझ्याकडं अरविंद केजरीवाल यांच्यासोबत एकूण 700 पेजचं व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम चॅट्स आहेत. त्यांनी 2020 मध्ये टीआरएस कार्यालयाला ₹75 कोटी दिले होते. या दाव्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. अधिवक्ता अनंत मलिक यांच्यामार्फत हे पत्र जारी करण्यात आलंय.

Sukesh Chandrasekhar
Varanasi : उपमुख्यमंत्र्यांच्या भावासोबत गैरव्यवहार; सामानासकट हॉटेलमधून हाकलून दिलं

निवेदनात असंही लिहिलंय, 'केजरीवालजी, मी 2020 शी संबंधित चॅटचा ट्रेलर दाखवणार आहे. यामध्ये तुम्ही आणि श्री जैन यांनी कोटींचा कोड वर्ड सेट केला होता. '15 किलो तूप', जे माझ्या माणसानं वितरित केलं होतं. म्हणजे, तुमचे 15 कोटी राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या वतीनं बीआरएसच्या पक्ष कार्यालयातील लिकर गेट प्रकरणातील आरोपीला देण्यात आलं, असाही आरोप करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात मी केजरीवाल यांच्याविरोधात मोठा खुलासा करेन, असंही त्यानं स्पष्ट केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.