फ्लाय पास्टमध्ये भारतीय वायुसेनेची ४५ विमाने, भारतीय नौदलातील एक आणि भारतीय लष्कराच्या चार हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक एअर शो. यामध्ये राफेल, मिग-29, एसयू-30, सुखोई-30 एमकेआय जग्वार, सी-130, सी-17, डॉर्नियर, डकोटा, एलसीएच प्रचंड, अपाचे, सारंग आणि AEW&C सारख्या जुन्या आणि आधुनिक विमाने/हेलिकॉप्टरचा समावेश आहे.
आंध्र प्रदेशाच्या अनोख्या संक्रांतीचं दर्शन पाहायाला मिळालं.
आकाश क्षेपणास्त्र हे भारताच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या सर्वात धोकादायक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. आकाश प्राइम स्वदेशी सक्रिय RF साधकासह सुसज्ज आहे, ज्यामुळे शत्रूचे लक्ष्य ओळखण्याची अचूकता वाढते.
आकाश-एनजी म्हणजेच आकाश न्यू जनरेशन क्षेपणास्त्राचीही यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. आकाश-एनजी हे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय हवाई दलासाठी बनवण्यात आले आहे. त्याची रेंज 40 ते 80 किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त, यात एक सक्रिय इलेक्ट्रॉनिकली स्कॅन केलेले अॅरे मल्टी फंक्शन रडार (MFR) आहे जे एकाच वेळी अनेक शत्रू क्षेपणास्त्रे किंवा विमाने स्कॅन करू शकतात.
सध्या भारतात आकाशचे तीन प्रकार आहेत – पहिला आकाश MK – त्याची श्रेणी 30KM आहे. दुसरा आकाश Mk.2 - त्याची श्रेणी 40KM आहे. त्यांचा वेग 2.5 Mach म्हणजेच 3087 किलोमीटर प्रति तास आहे.
कर्तव्य पथावर आज इतिहास घडला आहे. प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती मुर्मू यांना सलामी दिली आहे. परंपरेनुसार त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच, तिरंग्याला २१ तोफांची सलामी देण्यात आली. पहिल्यांदाच २१ तोफांची सलामी १०५ मिमी भारतीय फील्ड गनने देण्यात आली. या फील्ड गनने जुन्या 25 पाउंडर गनची जागा घेतली, जी संरक्षण क्षेत्रातील वाढती 'आत्मनिर्भरता' दर्शवते.
नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा राज्यातील 'साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर' याचे दर्शन होणार आहे.
सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला ध्वजारोहणाचा सोहळा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वच विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करुन देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. कारण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवादरम्यान आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. देशातील महान स्वातंत्र्य सेनानींच स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने पुढे जाऊया" असं मोदींनी या टि्वटमध्ये म्हटलय
भारताचा जवळचा मित्र असलेल्या इस्रायली दूतावासाने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्क्वॉड्रन लीडर सिंधू रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये 144 एअरमन आणि चार अधिकारी असतील. प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या फ्लायपास्टमध्ये हवाई दलाचे आणि स्वदेशी हलके लढाऊ विमान तेजस, हलके लढाऊ हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश क्षेपणास्त्र आणि सुखोई -30 बघायला मिळतील. फ्लाइट लेफ्टनंट भवना कांतही या फ्लायपास्टमध्ये सहभागी असतील.
फ्लायपास्टमध्ये समावेश असलेल्या ४२ विमानांपैकी १५ लढाऊ विमाने, ५ वाहतूक विमाने, १७ हेलिकॉप्टर्स, १ व्हिंटेज आणि ४ सैन्य हेलिकॉप्टर्स असतील. प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात हवाई दलाच्या पथकात ४ अधिकारी आणि ९६ हवाई योद्ध्यांचा समावेश असेल.
परंपरेनुसार प्रथम राष्ट्रध्वज फडकावला जाईल, त्यानंतर राष्ट्रगीत आणि त्यानंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल. 21 तोफांच्या सलामीसोबत 105 मिमीच्या भारतीय फील्ड गनही असतील. ते व्हिंटेज 25 पाउंडर गनची जागा घेईल, जी संरक्षणातील वाढत्या 'आत्मनिर्भरते'ला प्रतिबिंबित करेल. 105 हेलिकॉप्टर युनिटचे चार Mi-17 1V/V5 हेलिकॉप्टर कर्तव्य पथावर उपस्थित प्रेक्षकांवर पुष्पवृष्टी करतील.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9:51 वाजता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे सॅल्युटिंग डायसवर स्वागत करतील. सकाळी 10:30 वाजता राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यानंतर कर्तव्य पथवर परेड सुरू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.