Independence Day: नारी शक्ती ! या भारतीय महिलांनी स्वातंत्र्यलढ्यात दिलंय महत्वाचं योगदान

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा देत या महिलांनी नारीशक्तीचं प्रदर्शन त्या काळी केलं होतं.
Independence Day: Woman Power
Independence Day: Woman Poweresakal
Updated on

Independence Day: भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक भारतीय शूरवीरांनी महत्वाचं योगदान दिलंय. या प्रत्येकाच्या मोलाच्या योगदामुळे इंग्रजांच्या गुलामगिरीतीतून भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्या काळात जिथे महिलांवर अनेक बंधने लादण्यात यायची तिथे काही शूर महिलांनी स्वातंत्र्याच्या लढ्याची धूरा आपल्या हाती सांभाळली होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महिलांचाही मोलाचा वाटा आहे. जाणून घेऊया भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा असणाऱ्या शूर महिला.

बेगम हजरत महल

बेगम हजरत महल या पहिल्या भारतीय महिला होत्या ज्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्या. त्यांनी स्वांतंत्र्यलढ्यातील १८५७ च्या युद्धात मोलाचं योगदान दिलं होतं.

अरूणा असफ अली

अरूणा या भारतीय शिक्षिका होत्या. अरूणा असफ अली यांचा देखील भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग होता. भारत छोडो आंदोलनातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांना ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन इनडिपेंडंस म्हणून ओळखल्या जातं.

तारा राणी श्रीवास्तव

तारा राणी गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. १९४२ मध्ये इंग्रजांविरूद्धच्या युद्धात तिच्या पतीला गोळ्या घालून मारण्यात आले. मात्र तिने हार न मानता ते आंदोलन सुरूच ठेवले.

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई यांना शौर्याचं प्रतिक मानल्या जातं. तिच्या हिमतीच्या बळावर तिने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ब्रिटिशांशी लढा दिला होता. तिच्या शौर्य बळाची कहाणी इतिहासात अजरामर आहे.

Independence Day: Woman Power
Independence Day: हटके ड्रेसिंग करा अन् स्वातंत्र्य दिनाचा घ्या फील

सरोजिनी नायडू

सरोजिनी नायडू या एक कवयित्री होत्या. १९२५ साली त्यांची भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी खिलाफत चळवळ सुरू केली होती. तसेच त्या 'भारत छोडो' आंदोलनातही सहभागी होत्या.

Independence Day: Woman Power
Independence Day: राष्ट्रध्वज तिरंगा; जाणून घ्या पाकिस्तानसह १५ देशांच्या राष्ट्रध्वजांची नावं

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचा वाटा देत या महिलांनी नारीशक्तीचं प्रदर्शन त्या काळी केलं होतं जेव्हा या महिलांना समाजात दुय्यम स्थान दिलं जायचं. त्या काळी घराबाहेर अकारण पडण्याची जेथे महिलांना सूट नव्हती तेथे या काही महिलांनी घराचा व्हरांडा ओलांडत नारीशक्तीची ताकद जगाला दाखवून दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.