76th Independence Day: भारतासोबत हे 5 देश देखील 15 ऑगस्ट रोजी करतात स्वातंत्र्य दिन साजरा?

भारत 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे आणि भारताने स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण केली आहेत
76th Independence Day
76th Independence DayEsakal
Updated on

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते आणि पुढील वर्षी याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1948 रोजी या दिवसाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला त्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून पूर्ण एक वर्ष झाले होते. या आधारावर, यंदा 2023 मध्ये, भारत 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे आणि भारताने स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वत्र स्वातंत्र्य दिनाची तयारीही सुरू झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘राष्ट्र प्रथम, नेहमीच प्रथम’ (नेशन फर्स्ट, ऑल्वेज फर्स्ट’ ) अशी आहे.

इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947  रोजी स्वतंत्र झाला. मात्र, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा करणारा भारत हा एकमेव देश नाही. भारताव्यतिरिक्त असे अन्य 5 देश आहेत जे 15 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशांनाही 15 ऑगस्ट रोजीच स्वातंत्र्य मिळालं होतं.

76th Independence Day
Independence Day 2024 : स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावरच का साजरा होतो? जाणून घ्या रंजक कारण

1) दक्षिण कोरिया

भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरियाही या दिवशी आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यापूर्वी हा देश जपानच्या ताब्यात होता, मात्र 15 ऑगस्ट 1945 रोजी हा देश स्वतंत्र झाला.

2) उत्तर कोरिया

उत्तर कोरियाही 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. हा देशही पूर्वी जपानच्या ताब्यात होता. दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्यानंतर उत्तर कोरियाही स्वतंत्र झाले.

76th Independence Day
Independence Day 2023: स्वातंत्र्याच्या जवळपास २६ वर्षे आधी तयार होता तिरंगा; राष्ट्रध्वजाबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

3) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगोने 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच राज्यकर्त्यांपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हा देश मध्य आफ्रिकन प्रदेशात येतो. हे 1880 मध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी गुलाम बनवले होते. प्रथम हा देश फ्रेंच कांगो म्हणून ओळखला जात होता. नंतर 1903 मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जात होता. 

4) स्वातंत्र्यानंतर, फुलबर्ट यूलू हे देशाचे पहिले राष्ट्रपती झाले आणि त्यांनी 1963 पर्यंत या पदी कायम होते. बहरीन 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वतंत्र झाले. बहारीनवर ब्रिटनचा ताबा होता. या दिवशी बहरीनचा शासक इसा बिन सलमान अल खलिफा याची बहरीनच्या प्रमुख पदाची निवड झाली.

76th Independence Day
Nag Panchami 2023 : यंदा नागपंचमी कधी आहे ? जाणून घेऊ या पूजेचे महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी

5) जगातील सर्वात लहान देशांपैकी एक असलेल्या लिकटेंस्टीनला 1866 मध्ये जर्मन राज्यकर्त्यांपासून स्वातंत्र्य मिळाले. मात्र 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिन 1940 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. या दिवशी संपूर्ण देशात सुट्टी असते. 5 ऑगस्ट 1940 रोजी, लिकटेंस्टीनच्या प्रिन्सिपॅलिटीच्या सरकारने अधिकृतपणे 15 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.