7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, किती वाढणार पगार?

7th Pay Commission
7th Pay Commissionesakal
Updated on

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. आज 30 जून कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढीची भेट मिळू शकते.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल. आज संध्याकाळी AICPI निर्देशांकाचे आकडे येणार आहेत. हे आकडे मे महिन्यासाठी सीपीआयचे असतील. त्यावरून जुलैमध्ये महागाई भत्त्यात किती वाढ होऊ शकते, हे कळेल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी AICPI च्या ट्रेंडवरून हे स्पष्ट झाले आहे की महागाई भत्त्यात प्रचंड वाढ होणार आहे. जुलै 2023 मध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जवळपास निश्चित मानल्या जात आहे. कर्मचाऱ्यांना आता 42 वाढ मिळते त्याऐवजी आता 46 टक्के महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे.

महागाई भत्ता किती वाढेल?


जुलै 2023 च्या महागाई भत्त्यात वाढीसाठी मे महिन्याचा निर्देशांक आज जारी केला जाईल. यानंतर हे स्पष्ट होईल की महागाई भत्ता स्कोअर किती वाढेल. गेल्या महिन्यात AICPI निर्देशांक 0.72 अंकांनी वाढला होता.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक (AICPI) च्या आधारे निश्चित केला जातो. हे क्रमांक दर महिन्याच्या शेवटी जारी केले जातात. या आधारे पुढील 6 महिन्यांत होणार्‍या रिव्हिजनपर्यंत डीए स्कोअर किती पोहोचला हे कळते.

7th Pay Commission
Ambati Rayudu In Politics : अंबाती रायुडूची राजकारणात उडी; आंध्राचा अँग्री यंग मॅन म्हणतो लवकरच...

मे महिन्याची आकडेवारी जाहीर होणार-

कामगार ब्युरोने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत 4 महिन्यांसाठी AICPI क्रमांक जारी केले आहेत. एप्रिलमध्ये निर्देशांक 134.02 होता. या आधारावर डीए स्कोअर 45.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. जानेवारीमध्ये डीए स्कोअर 43.08 टक्के, फेब्रुवारीमध्ये 43.79 टक्के आणि मार्चमध्ये 44.46 टक्के होता.

आता मे महिन्याची आकडेवारी जाहीर होणार आहे. जरी निर्देशांक वाढला नाही तरी DA स्कोअर 45.45 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ असा की जुलैमध्ये जूनचे आकडे जाहीर होईपर्यंत डीए स्कोअर 45.50 टक्क्यांच्या वर असेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये ४६ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

7th Pay Commission
Manipur Violence: मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.