Ayodhya Crime: अयोध्या येथे एका कॉलेज तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कॉलेज विद्यार्थिनी राम जन्मभूमी मंदिरात सफाई कर्मचारी म्हणून देखील काम करते. पीडित तरुणीने यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात कारवाई केली आहे. 'फ्री प्रेस जर्नल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आरोप केलाय की, वंश चौधरी नावाच्या तिच्या मित्राने तिला शहर फिरवतो असं म्हटलं होतं. पण, याच माध्यमातून त्याने तरुणीवर अत्याचार केला आहे. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, तिचे २५ ऑगस्ट रोजी अपहरण करण्यात आले होते. यावेळी ती मंदिराकडे जात होती. वंश हा उदित कुमार, सतराम चौधरी आणि इतर दोघांसोबत गाडीमध्ये होता.