Naxalites killed: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; गेल्या 72 तासात 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

security forces Chhattisgarh: भारतीय सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई आक्रमक केली आहे.
Naxalites
Naxalites
Updated on

नवी दिल्ली- भारतीय सुरक्षा दलाने गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई आक्रमक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या ७२ तासांमध्ये सुरक्षा दलाकडून ८ नक्षलींचा खात्मा करण्यात आला आहे. छत्तीसगडच्या दंतवाडामधील नारायणपूर-बिजपूर सीमा भागात ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डीएसपी राहुल उके यांनी यांसदर्भातील अधिक माहिती दिली. आम्हाला भागामध्ये ४० ते ४५ नक्षली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही या भागाला घेरलं होतं. आम्ही शोधमोहीम सुरु केली. याचदरम्यान त्यांनी गोळीबार सुरु केला. दुसऱ्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही १८ लोकांना पकडलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे, असं ते म्हणाले आहेत.

Naxalites
Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर भररस्त्यात हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

DRG, STF आणि बस्तर फायटर्स सुरक्षा जवानांनी तीन जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद विरोधी ऑपरेशन राबवले होते. यात माओवाद्यांच्या संघटनेला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. जवानांनी केवळ आठ नक्षलांना मारलं नाही तर मोठ्या प्रमाणात विस्फोटकं जप्त केली आहेत. तसेच नक्षल्यांचे ट्रेनिंग कॅम्प देखील उद्धवस्त करण्यात आले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जवानांनी ऑपरेशन राबवले होते. आतापर्यंत जवानांनी ११२ नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे.

Naxalites
मिरचीपूड टाकून इंदापूरच्या तहसीलदारांवर हल्ला; आमदार भरणेंकडून कठोर कारवाईचे पोलीस प्रशासनाला आदेश

गेल्या काही वर्षांपासून नक्षल चळवळ मागे हटत असल्याचं चित्र आहे. भारतीय सुरक्षा दलाने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि गावकऱ्यांचे समर्थन मिळत नसल्याने त्यांची संघटना कमजोर झाली आहे. ट्रेनिंग सेंटरवर हल्ला करुन नक्षलवाद्यांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

याच ठिकाणी नक्षलवाद्यांना ट्रेनिंग दिलं जात होतं अशी माहिती आहे. जवळपास १ एकरच्या भागात हे ट्रेनिंग सेंटर पसरले होते. अद्याप मारले गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली नाही. पण, मारले गेलेल्यांमध्ये चार महिला आणि चार पुरुष होते असं कळतंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()