Gujarat : आलिशान जीवनाचा त्याग, करोडोंची संपत्ती नाकारली.. हिरे व्यापाऱ्याची 8 वर्षांची मुलगी झाली 'संन्यासी'

देवांशीनं दीक्षेचा मार्ग निवडला नसता, तर ती मोठी झाल्यावर करोडो रुपयांच्या हिरे कंपनीची मालकीन बनली असती.'
Devanshi Sanghvi
Devanshi Sanghviesakal
Updated on
Summary

हिरे व्यापाऱ्याची मुलगी देवांशी संघवीनं 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आणि ती संन्यासीनी बनली.

सुरत : सुरतमधील (Gujarat Surat) एका हिरे व्यावसायिकाच्या (Diamond Professional) अवघ्या 8 वर्षांच्या मुलीनं विलासी जीवन सोडून भिक्षुत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलाय.

खेळण्या-बागडण्याच्या वयात हिरे व्यापारी धनेश यांची वारस कन्या बुधवारी जैन धर्म (Jainism) स्वीकारून संन्यासीनी बनलीये. देवांशी संघवी (Devanshi Sanghvi) असं या मुलीचं नाव असून, ती दोन बहिणींमध्ये मोठी आहे. मंगळवारी देवांशीनं जैन धर्माच्या कार्यक्रमात दीक्षा घेतली.

Devanshi Sanghvi
BJP National Meeting : 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील; अमित शहांचं मोठं वक्तव्य

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हिरे व्यापाऱ्याची मुलगी देवांशी संघवीनं 367 दीक्षा कार्यक्रमात भाग घेतला आणि ती संन्यासीनी बनली. कुटुंबातील एक सदस्यानं सांगितलं की, 'देवांशीनं आजपर्यंत ना टीव्ही पाहिला, ना चित्रपट. एवढंच नाही तर ती कधीही कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेलेली नाही. देवांशीनं दीक्षेचा मार्ग निवडला नसता, तर ती मोठी झाल्यावर करोडो रुपयांच्या हिरे कंपनीची मालकीन बनली असती.'

Devanshi Sanghvi
Lucile Randon : जगातील सर्वात वृद्ध महिलेचं निधन; लुसिली रँडन यांनी 118 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

देवांशी ही धनेश संघवी यांची कन्या आहे, जे मोहन संघवी (Mohan Sanghvi) यांचा एकुलता एक मुलगा आहे. धनेश संघवी यांच्या मालकीच्या डायमंड कंपनीच्या (Diamond Company) जगभरात शाखा आहेत आणि वार्षिक उलाढाल सुमारे 100 कोटी आहे. देवांशीच्या धाकट्या बहिणीचं नाव काव्या असून ती पाच वर्षांची आहे. आचार्य विजय कीर्तियशसुरी यांनी देवांशीला दीक्षा दिली.

Devanshi Sanghvi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खुशखबर! शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी तब्बल 700 कोटींचा निधी मंजूर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरे व्यापारी धनेश आणि त्यांचं कुटुंब खूप श्रीमंत असलं तरी त्यांची जीवनशैली अतिशय साधी राहिलीये. हे घराणं सुरुवातीपासूनच धार्मिक आहे. 8 वर्षांच्या देवांशीला हिंदी, इंग्रजीसह अनेक भाषा अवगत आहेत. इतकंच नाही तर देवांशी संगीतात पारंगत असून नृत्य आणि योगामध्येही ती खूप हुशार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.