Delhi : शाळा-महाविद्यालयांमध्ये ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या 8 तरुणांना अटक

या प्रकरणात बीबीए, एमबीए, आयआयएम, बीटेक आणि फॅशन डिझायनर ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
Drugs
Drugsesakal
Updated on
Summary

या प्रकरणात बीबीए, एमबीए, आयआयएम, बीटेक आणि फॅशन डिझायनर ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दिल्ली : तरुणांमध्ये ड्रग्जची (Drugs) वाढती क्रेझ पाहता देशाची राजधानी दिल्लीत पोलिसांच्या (Delhi Police) अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सनं छापा टाकून ड्रग्जसाठा जप्त केलाय. पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये 8 तरुणांना पकडलं असून यात बीबीए, एमबीए, आयआयएम, बीटेक आणि फॅशन डिझायनर ह्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे लोक एका अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवायचे.

आरोपी विद्यार्थी शाळा (School), महाविद्यालये, संस्था, व्यवस्थापन महाविद्यालये यांना लक्ष्य करत तिथं शिकणाऱ्या मुलांना अंमली पदार्थांची सवय लावायचे. त्यासाठी वेगवेगळ्या कुरिअरद्वारे पुरवठा केला जात होता. दिल्ली पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सनं (Anti Narcotics Task Force) ड्रग्जशी संबंधित या औषधांचा खुलासा करून एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय.

Drugs
Love Affair : दोघांचं एकाच लेडी कॉन्स्टेबलवर जडलं 'प्रेम'; गोळीबार करत ठाण्यातच हाणामारी

त्याअंतर्गत LSD चे 28 ब्लॉट पेपर, 12.6 ग्रॅम MDMA, 84 ग्रॅम क्युरेटेड गांजा आणि 220 चरस जप्त करण्यात आले आहे. त्याची LSD साठी दिल्लीतील स्ट्रीट किंमत 5000 प्रति स्टॅम्प आहे. MDMA 4000 प्रति ग्रॅम आणि गांजासाठी 3000 प्रति ग्रॅम आकारले जात होते. या प्रकरणात पकडलेल्या तरुणांमध्ये बीबीए, बीटेक ड्रॉप आऊट आणि फॅशन डिझायनरच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासाठी कुरिअर नेटवर्क सेवा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापरली जात होती. यामध्ये वी फास्ट, उबर डिलिव्हरी, स्विगी, जीनी आणि इतर माध्यमातून डिलिव्हरी केली जात होती. जप्त करण्यात आलेल्या सर्व मालाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.

Drugs
माफी मागणार नाही म्हणत 'आप'च्या नेत्यानं पत्रकार परिषदेतच फाडली उपराज्यपालांची नोटीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.