Film Actress : रेव्ह पार्टीत 'या' अभिनेत्रीसह 86 जणांनी ड्रग्स घेतल्याचे रक्ताच्या नमुन्यांवरून झाले स्पष्ट; पोलिस सूत्रांकडून माहिती

बर्थडे पार्टीच्या बहाण्याने आयोजित केलेल्या या रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) एकूण १०३ जण होते.
Telugu Film Actress Hema
Telugu Film Actress Hemaesakal
Updated on
Summary

इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील जी. आर. फार्म हाऊस येथे रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही पार्टी सुरू झाली आणि सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती.

बंगळूर : बंगळूरच्या बाहेरील फार्महाऊसमध्ये नुकत्याच झालेल्या रेव्ह पार्टीमध्ये सहभागी झालेल्यांच्या रक्ताच्या नमुन्यांवरून एका तेलगू चित्रपट अभिनेत्री हेमासह (Telugu Film Actress) ८६ जणांनी अमली पदार्थ (ड्रग्स) घेतल्याची पुष्टी केली आहे, असे पोलिस सूत्रांनी गुरुवारी सांगितले.

Telugu Film Actress Hema
'या' अभिनेत्रीसह 101 सेलिब्रिटींचा रेव्ह पार्टीत सहभाग; कारवाई करत पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहिती

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्थडे पार्टीच्या बहाण्याने आयोजित केलेल्या या रेव्ह पार्टीमध्ये (Rave Party) एकूण १०३ जण होते. सहभागींमध्ये ७३ पुरुष आणि ३० महिलांचा समावेश होता. पोलिसांनी १९ मे रोजी पहाटे फार्महाऊसवर छापा टाकला आणि एमडीएमएच्या गोळ्या, हायड्रो गांजा, कोकेन, मोटार, डीजे उपकरणे, ध्वनी आणि प्रकाश उपकरणे यांसह १.५ कोटींच्या वस्तू जप्त केल्या. पोलिसांनी खासगी रुग्णालयात सर्वांच्या रक्ताचे नमुने गोळा केले.

Telugu Film Actress Hema
Car Accident : दुचाकीवरून औषध आणण्यासाठी जाणाऱ्या सख्ख्या बहि‍णींवर काळाचा घाला; कारच्या धडकेत दोघी ठार, भाऊही जखमी

ज्यामध्ये ५९ पुरुष आणि २७ महिलांनी ड्रग्सचे (Drugs) सेवन केल्याचे स्पष्ट झाले. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना केंद्रीय गुन्हे शाखा नोटीस बजावेल. रविवारी (ता. १९) मध्यरात्री वासूच्या नावाने बर्थडे पार्टी होती. पार्टीसाठी दोन लाखांपर्यंत प्रवेशशुल्क होते. इलेक्ट्रॉनिक सिटीजवळील जी. आर. फार्म हाऊस येथे रविवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून ही पार्टी सुरू झाली आणि सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.