Survey : देशात मतदानाबाबत मत बदललं; 86 टक्के लोक म्हणतात...

भारतात, 2011 पासून राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो.
voting
votingSakal
Updated on

नवी दिल्ली : देशातील मतदानाबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतातील 86 टक्के लोकांना मतदान (Voting) सक्तीचे व्हावे अशी माहिती समोर आली आहे. 12 व्या राष्ट्रीय मतदार (National Voters Day) दिनी मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या या नव्या सर्वेक्षणातून (Survey) ही बाब समोर आली आहे. 'पब्लिक अॅप'ने देशभरातील चार लाखांहून अधिक लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात, 81 टक्के सहभागींनी विद्यमान मतदान प्रणालीवर विश्वास व्यक्त केला. यापैकी 60 टक्के सहभागी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. (Voting Survey By Public App)

voting
Voters Day : मतदान कार्ड बनवायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या फंडा

सर्वेक्षणात म्हटले आहे की, "नागरिक कर्तव्य म्हणून मतदान करणे हे सामाजिक विकासात नागरिकांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशात मतदान सक्तीचे करावे का, असे विचारले असता, 86 टक्के सहभागींनी याला सहमती दर्शवली आहे. तर 81 टक्के सहभागींनी सध्याची मतदान (Voting Process In India) प्रक्रिया पारदर्शक असल्याचे मत नोंदविले आहे. मतदारांचा (Voter) दृष्टिकोन ठरवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवरही सर्वेक्षणात प्रकाश टाकण्यात आला आहे.

voting
चाबहार बंदर : भारताने केलं 'पाक'ला बायपास, शोधला नवा मार्ग

मतदानाच्या वेळी 34 टक्के मतदार मागील टर्ममधील उमेदवारांच्या (Election Candidate) कामगिरीकडे पाहत असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. त्याच वेळी, 31 टक्के मतदार सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचा तुलनात्मक अभ्यास करून निर्णय घेत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. त्याशिवाय 4.96 सहभागी झालेल्यांसाठी, उमेदवारांची लोकप्रियता सर्वात जास्त महत्त्वाची आहे. तर, उमेदवार (Election Candidate Work) कोणत्या पक्षाचा आहे याला 11.92 मतदार जास्त महत्त्व देत असल्याची नोंद सर्वेक्षणात करण्यात आली आहे.

voting
Budget 2022 : स्वदेशी जागरण मंचाच्या रडारवर 'स्टार्टअप्स'

मतदान (Voting) न करण्याच्या प्रश्नावर, 30.04 सहभागींनी सांगितले की, याला मुख्यकारण कामानिमित्त शहराबाहेर असणे हे आहे. तथापि, 56.3 टक्के सर्वेक्षणात (Survey) सहभागींनी दावा केला की, त्यांनी मतदानाची एकही संधी सोडलेली नाही. तर 79.5 टक्के सहभागींनी आयुष्यात एकदा तरी मतदान (Voting) केल्याचे म्हटले आहे. 5.22 टक्के सहभागींनी त्यांना निवडणुकीबद्दल माहिती नसल्याचे तर, 7.19 टक्के लोकांनी कोणत्याही (Political Party) पक्षाला पाठिंबा न दिल्यामुळे मतदानासाठी गेले नसल्याचे सांगितले आहे. भारतात, 2011 पासून निवडणूक आयोगाचा (Election Commission Of India) स्थापना दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. नवीन आणि तरुण (Young Voters In India) मतदारांच्या नोंदणीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. 25 जानेवारी 1950 रोजी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.