नवी दिल्ली : सध्या जगावर ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचं संकट आहे. आपल्या देशात देखील ओमिक्रॉनचे चार रुग्ण आढळून आले असून चिंता आणखी वाढली आहे. तसेच डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण देखील सापडत आहेत. गेल्या २४ तासांत देशात ८८९५ कोरोनाचे (India Corona Cases) नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच कोरोना मृत्यूंच्या (India Corona Death Toll) आकड्यात अचानक वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
देशात गेल्या २४ तासांत २७९६ इतक्या मृत्यूची नोंद करण्यात आली. बिहारमध्ये यापूर्वी 2,426 जणांचे कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मात्र, त्यांची नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेल्या २४ तासांत या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तसेच केरळमधील देखील २६३ मृत्यूंच्या आकड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा अचानक वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या २४ तासांत देशात ८८९५ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सध्या देशात ९९१५५ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरणासाठी पात्र असलेल्या ५० टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरणाचा आकडा 1,27,61,83,065, वर पोहोचला आहे, असंही आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.
ओमिक्रॉनने वाढवली चिंता -
सध्या जगावर ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचे संकट आहे. भारतात देखील ओमिक्रॉनचे चार रुग्ण आढळून आले आहेत. चार दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर शनिवारी गुजरातमधील जामनगर येथे एक रुग्ण आढळून आला. तसेच शनिवारी सायंकाळी मुंबईतील डोंबिवली येथील ३३ वर्षीय रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या चार-पाच दिवसांत हे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागासमोर चिंता आणखी वाढलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.