उत्तर प्रदेशच्या बरेली येथे गळ आवळून होत असलेल्या माहिलांच्या हत्यांचे सत्र थांबताना दिसत नाहीये. बरेली जिल्ह्यातील शिशगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत चारा घेऊन घरी परतत असलेल्या महिलेची कथित रित्या साडीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी सोमवारी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पाच महिन्यात महिलांच्या एकाच पद्धतीने हत्या झाल्याची ही नववी घटना आहे.
बरेली जिल्ह्यातील शिशगड आणि शाही इत्यादी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाच महिन्यांच्या काळात वयस्क महिलांची साडी आणि ओढणीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच्या तब्बल नऊ घटना उघड झाल्या आहेत.
अशाच स्वरूपाच्या अनेक घटनांचे आव्हाण लक्षात घेता पोलिसांची पाळत वाढविण्यात आली असून या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिशगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जगदीशपूर गावात राहणाऱ्या उर्मिला देवी गंगवार (वय ५५) या रविवारी दुपारी अडीच वाजता घरातून जनावरांचा चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. बराच वेळ होऊनही त्या घरी न परतल्याने सायंकाळी त्यांचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बराच शोध घेतल्यानंतर उर्मिलाचा मृतदेह त्यांचे पती वेदप्रकाश गंगवार यांना गावापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या शेताजवळ सापडला. महिलेच्या गळ्यात साडी होती आणि तिची जीभ बाहेर आली होती आणि डोक्याच्या मागील बाजूस जखमांच्या खुणा होत्या. माहिती मिळताच पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लखीमपूर येथील महमूद कुल्चा गावात धनवती, वीरावती येथील सेवा ज्वालापुर , खजुरिया येथील रहिवासी कुसमा देवी, शाही येथील मुबारकपूर गावातील शांती देवी, आनंदपूर येथील प्रेमवती, मीरगंज पोलिस स्टेशन हद्दीतील गाव गुला येथील रेश्मा देवी व शाही गावातील खरसेनीच्या दुलारी देवी या सगळ्या महिलांची हत्या झाली आहे. यामध्ये अधिकतर महिलांचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे.
बरेलीचे आयजी डॉक्टर राकेश सिंह यांनी संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सिंह यांनी सांगितले की, सर्व नऊ घटनांमध्ये मोठ्या प्रणाणात समानता आहेत. त्यांनी सांगितलं की घटनास्थळांचे निपीक्षण करणे, तसंच ज्या-ज्या गावात घटना घडल्या आहेत तेथील सरपंचांची आणि प्रमुख लोकांची बेठक आयोजित केली जाईल.
सिंह यांनी सांगितलं की दोन विशेष पथके तयार करण्यात आले आहेत. एक पथक थेट काम करेल तर दुसरं पथक गावातील प्रमुख व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काम करेल. तसेच साध्या कपड्यांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा वावर देखील वाढवला जाईल. हे प्रकरण एक आव्हान म्हणून स्वीकारल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.