Pitbull Attack: शाळेत निघालेल्या चिमुकलीवर पिटबुल कुत्र्याचा हल्ला! 22 ठिकाणी घेतला चावा; ICUमध्ये दाखल

पिटबुल जातीच्या कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत
Pitbull Attack
Pitbull AttackEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने आपल्या मालकांवर किंवा अनोळखी व्यक्तिंवर हल्ला केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. दरम्यान आता शाळेत जाणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर नसबंदी केंद्रातून आलेल्या पिटबुल कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.(Latest Marathi News)

ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क भागात शाळेत जात असलेल्या नऊ वर्षांच्या मुलीवर नसबंदी केंद्रातून आलेल्या पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे मुलीच्या पायाला जबर दुखापत झाली. मुलीच्या पायावर २२ ठिकाणी चावा घेतल्याच्या खुणा आहेत. जखमी मुलीला शास्त्री पार्क येथील प्रवेशचंद रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये ठेवले आहे.

Pitbull Attack
Ganesh Chaturthi 2023: आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास पडलं महागात; आयुक्तांनी केलं निलंबित

जखमी मुलीचे आजोबा चतर सिंग यांनी सांगितले की, मुलगी डीडीए फ्लॅटमध्ये असलेल्या कॉर्पोरेशन शाळेत चौथीच्या वर्गात शिकते. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास शिवानीची आजी शीला देवी तिला न्यू उस्मानपूर येथील शाळेत सोडत होत्या. वाटेत श्वान नसबंदी केंद्र आहे, दोघीही तिथे पोहोचताच नसबंदी केंद्रातून बाहेर पडलेल्या कुत्र्याने मुलीवर हल्ला केला. हा कुत्रा परदेशी जातीचा पिट बुल होता, जो शास्त्री पार्कच्या श्वान नसबंदी केंद्रातून बाहेर आला होता. (Marathi Tajya Batmya)

मुलीची आजी शीला देवी यांनी सांगितले की, ती गुरुवारी सकाळी नात शिवानीला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. तिच्या परीक्षा सुरू आहेत. दोघीही उस्मानपूर डीडीए फ्लॅटमध्ये असलेल्या नसबंदी केंद्राबाहेर पोहोचले असता, मुलीवर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. नसबंदी केंद्राचा दरवाजा उघडा असताना कुत्रा बाहेर आला होता. त्यानंतर तेथून जाणाऱ्या अख्तर मिर्झा या अपंग शिक्षकाने आपल्या स्कूटरने कुत्र्याला धडक दिली, त्यानंतर कुत्र्याने मुलीला सोडले. मुलीने स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण कुत्र्याने तिला सोडले नाही.

Pitbull Attack
Supriya Sule News : सुप्रिया सुळेंनी दिली भाजप खासदाराविरोधात हक्कभंगाची नोटीस, नेमकं प्रकरण काय?

एमसीडीने ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. न्यू उस्मानपूर येथील एमसीडी फ्लॅटमध्ये एबीसी सेंटर सुरू करण्यात आले आहे. या घटनेला एबीसी केंद्र जबाबदार नसल्याचे तपासात समोर आले आहे. एमसीडी क्षेत्रात नियमांचे पालन केले जात आहे.

दररोज हजाराहून अधिक लोक बनतात भटक्या कुत्र्यांचा बळी

राजधानी दिल्लीत भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी वाढली आहे की, दररोज हजारो लोक त्यांच्या चाव्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे सकाळपासूनच रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी रुग्णालयांमध्ये रांगा दिसत आहेत. मध्य दिल्लीतील डॉ. राम मनोहर लोहिया ते एकट्या सफदरजंग हॉस्पिटलपर्यंत दररोज ४००-५०० रुग्ण कुत्रा चावल्याने रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी येत असल्याची माहिती आहे.

Pitbull Attack
Crime News: नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार! अंधश्रद्धेतून महिलेला मारहाण करत खाऊ घातली स्मशानभूमीतील राख

तसेच पूर्व दिल्लीतील लाल बहादूर शास्त्री रुग्णालयापासून ते दिल्लीच्या बाहेरचेही लोक लसीकरणासाठी येत आहेत. दिल्लीच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दररोज सुमारे 250 लोक रेबीज लसीकरणासाठी येतात. महामंडळाने रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी 20 केंद्रेही उभारली आहेत. महामंडळाच्या या केंद्रांमध्येही दररोज सुमारे ३०० लसीकरण केले जात असल्याचे एका ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले. बहुतेक लोकांच्या पायाला कुत्रे चावतात.

आरएमएल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी २०० लोक रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी येतात. पाच लसीकरण आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. उष्णता वाढल्याने बहुतांश घटना घडतात. उष्णता वाढली की कुत्रे जास्त आक्रमक होतात आणि माणसांची शिकार करू लागतात. त्यांनी सांगितले की, जे लोक लसीकरणासाठी येतात, त्यापैकी मोठ्या संख्येने एनआरसीचे देखील आहेत.

Pitbull Attack
Ganesh Chaturthi 2023: आजारपणाच कारण देत गणपतीसाठी गावाला जाणं पोलीस निरीक्षकास पडलं महागात; आयुक्तांनी केलं निलंबित

सातत्याने वाढत आहेत घटना

15 सप्टेंबर : वसंत कुंज परिसरात एका महिलेवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली असून यादरम्यान महिला गंभीर जखमी झाली आहे.

12 जून : गीता कॉलनीत पाच वर्षाच्या चिमुरड्याला शेजारच्या पाळीव कुत्र्याने चावा घेतला.

03 मे. रंगपुरी परिसरात एका सात वर्षांच्या मुलीवर कुत्र्याने हल्ला करून जखमी केले.

12 एप्रिल : मॉडेल टाऊनमधील गोटेवाला पार्कमध्ये फिरायला गेलेल्या एका व्यक्तीला कुत्र्याने चावा घेतला.

12 मार्च : रुची विहार, वसंत कुंज येथील वनपरिक्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी पाच आणि सात वर्षांच्या दोन मुलांना चावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.