9 Years of Modi Govt : मोदींच्या ९ वर्षात देश कसा बनला 'डिजिटल इंडिया'? हे सहा निर्णय ठरले महत्त्वाचे

आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने कित्येक मोठे निर्णय घेतले.
Digital India
Digital IndiaEsakal
Updated on

मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची चार वर्षं आज पूर्ण होत आहेत. मागची आणि ही टर्म मिळून आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात या सरकारने कित्येक मोठे निर्णय घेतले. मोदी सरकारच्या या निर्णयांमुळेच भारताची जगातील प्रतिमा बदलली आहे. आपला नवभारत आता आत्मनिर्भर आणि डिजिटल झाला आहे.

देशाला 'डिजिटल इंडिया' बनवण्यासाठी मोदी सरकारने कित्येक मोठे निर्णय घेतले. याचा थेट परिणाम सामान्यांच्या दैनंदिन जीवनावर झाला आहे. हे कोणते निर्णय होते, आणि त्यांचा लोकांवर काय परिणाम झाला हे पाहूयात.

Digital India
Narendra Modi Video : "वो देश है इंडिया" मोदींच्या भाषणाने सिडनी दणाणून गेली, भारताचा जयजयकार

१. डिजिटल इंडिया

२०१४ साली सत्तेत आल्यानंतर एका वर्षातच डिजिटल इंडिया मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. डिजिटल टेक्नॉलॉजी आणि सेवा या सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत नॅशनल ओपन फायबर ऑप्टिक नेटवर्क आणि भारतनेट या परियोजना सुरू करण्यात आल्या.

२. डिजिटल पेमेंट

मोदी सरकारचं सर्वात मोठं यश म्हणजे डिजिटल पेमेंट. आज रिक्षावाले, दुकानदार किंवा अगदी रस्त्याच्या कडेला बसणारे भाजी विक्रेते यांच्याकडेही तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करू शकता. भारत सरकारने २०१६ साली यूपीआय लाँच केले होते. यासोबतच सरकारने डिजिटल मुद्रा आणि भीम अ‍ॅपदेखील लाँच केले होते. या सर्व गोष्टींमुळे देशात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.

३. को-विन अ‍ॅप

कोरोना महामारीच्या काळात मोदी सरकारने हे अ‍ॅप लाँच केले होते. आपल्या भागातील कोरोना रुग्णांची संख्या, कोरोना विषाणूबाबत इतर माहिती, कोरोना लसीकरण सेंटर अशा सर्व गोष्टींची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध होती.

Digital India
New Parliament Building : आता PM मोदी आणणार ७५ रुपयांचं नाणं! वापरली जाणार ५० टक्के चांदी

४. उमंग अ‍ॅप

भारत सरकारने तयार केलेले उमंग हे एक मल्टिटास्किंग अ‍ॅप आहे. सरकारच्या विविध प्रकारच्या सेवा या अ‍ॅपवर एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये पासपोर्ट सेवा, पॅन कार्ड, आधार कार्ड, लोकसेवा योजना, आरोग्य सेवा, बँकिंग सेवा, वित्त सेवा, शेतकरी सेवा, नोकरी सेवा, डिजिटल पेमेंट आणि इतर अन्य सेवा उपलब्ध आहेत.

मोदी सरकारच्या इंडिया इनिशिएटिव्हचा भाग असलेल्या या अ‍ॅपवर मिळणाऱ्या सुविधा पाहता, याला सुपर अ‍ॅपही म्हटलं जातंय.

५. डिजीलॉकर

मोदी सरकारने लाँच केलेली ही डिजिटल लॉकर सर्व्हिस लोकांच्या भरपूर फायद्याची ठरत आहे. आपले सर्व डॉक्युमेंट्स आणि सर्टिफिकेट्सची सॉफ्ट कॉपी एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स, व्होटर आयडी किंवा अन्य कोणतीही कागदपत्रे तुमच्या सोबत बाळगण्याची गरज भासत नाही. केवळ या अ‍ॅपसोबत तुमचं आधार कार्ड लिंक केल्यानंतर तुम्ही कुठूनही आपली डॉक्युमेंट्स अ‍ॅक्सेस करू शकता.

६. ५-जी नेटवर्क

गेल्या वर्षीच मोदी सरकारने देशात ५-जी नेटवर्क लाँच केले. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक शहरांमध्ये टेलिकॉम कंपन्यांनी ही सेवा सुरू केली आहे. या सेवेचा विस्तार सुरू असून, २०२४ च्या मार्च महिन्यापर्यंत देशभरातील सर्व यूजर्सना ५-जी सेवेचा लाभ घेता येईल.

Digital India
PM Narendra Modi : दौऱ्याचा प्रत्येक क्षण देशासाठी वापरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.