नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीजवळ एका 50 वर्षीय व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, याबाबतची माहिती दिल्ली पोलीसांनी दिली आहे. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली, परंतु इमारतीच्या आजूबाजूला तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी लागलीच ती आग विझवली. हा व्यक्ती नोएडाचा रहिवासी असल्याचं कळलं आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील प्रसारित झाला आहे, ज्यामध्ये पोलिस या पेटवून घेतलेल्या व्यक्तीला मदत करताना दिसत आहेत.
“मी अतिशय गरीब कुटुंबातील आहे. माझे कुटुंब उपाशी आहे,” असे तो माणूस म्हणताना ऐकू येतो. सर्वोच्च न्यायालयाबाहेर तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला आणखी दुखापत होऊ नये म्हणून त्याचे कपडे फाडले. त्यांच्यापैकी एकाने त्याला असंही सांगून पाहिलं की, आत्महत्या केल्याने परिस्थिती सुधारण्यास मदत होणार नाही. त्यानंतर दोन पोलिसांनी त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी सांगितलंय की, त्या व्यक्तीच्या व्यक्तीगत आयुष्यात अनेक समस्या असल्याने त्याने सर्वोच्च न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. या साऱ्या प्रकारामुळे तो कितपत जखमी झाला आहे, हे कळणं बाकी आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वोच्च न्यायालयाबाहेर अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.