Arvind Kejriwal : "२०२५ च्या निवडणुकीआधी आपण एकत्रच यमुनेत डुबकी मारू"

या आधीही अनेकदा केजरीवाल यांनी यमुना नदी स्वच्छ करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ते झालं नाही.
Arvind Kejriwal demands delhi independent state once again
Arvind Kejriwal demands delhi independent state once againSakal
Updated on

Arvind Kejriwal News : दिल्लीचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात यमुना नदीच्या स्वच्छतेबरोबरच दिल्लीच्या सुशोभीकरणासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Arvind Kejriwal On Delhi Budget)

यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी ६ कलमी कृती कार्यक्रम राबवण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी सांगितली. मागच्या निवडणुकीच्या वेळीही त्यांनी हेच आश्वासन दिलं होतं. मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्याबद्दल आज माध्यमांनी केजरीवाल यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने चांगलाच हशा पिकला.

आपल्या सरकारने यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी ६ कलमी कार्यक्रम तयार केल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं. तसंच २०२५ च्या पुढच्या निवडणुकीच्या आधी मी तुमच्यासोबत यमुना नदीत डुबकी मारेन, असं उत्तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माध्यमांना दिलं.

दिल्लीचे अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज ७८,८०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. २०२२-२३ या वर्षात ७५,८०० रुपयांचं बजेट सादर करण्यात आलं होतं. आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांसोबतच शहरातल्या पायाभूत सुविधा आणि स्वच्छतेवरही या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचं अर्थमंत्री गेहलोत यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.