प्राण्यांना माणसासारखं बोलता येत नाही हे खरंय; पण त्यांना सहानुभूतीची आणि प्रेमाची भाषा नक्कीच कळते. याची प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये एक हत्तीचं पिल्लांने एका विनाधिकाऱ्याच्या पायाला सोंडेने पकडले आहे. हा फोटो जितका हृदयस्पर्शी आहे त्यापेक्षा फोटोमागील स्टोरी रंजक आहे.
एका वनधिकाऱ्याने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. “प्रेमाला भाषा नसते. एक हत्तीचे पिल्लू वन अधिकाऱ्यांना मिठी मारत आहे. टीमने या पिल्लाची सुटका केली आणि आईशी पुन्हा भेट घडवली" हे कॅप्शनही त्यांनी दिलं होतं .
तामिळनाडूतील वन अधिकाऱ्यांना ‘टस्कर’ नावाचे हे हत्तीचे पिल्लू मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्या आईशी त्याची भेट घडवून आणली. टस्करने आपल्या सोंडेला अधिकाऱ्याच्या पायाभोवती गुंडाळले आणि बचावासाठी त्याचे आभार मानले.
१४ ऑक्टोबर रोजी हा फोटो शेअर केल्यापासून अनेकांनी लाईक कॉमेंटस वर्षाव केला आहे. “एका प्राण्याला माणसापेक्षा प्रेम जास्त समजते,” अशी कॉमेंट एका युजरने केली आहे, तर दुसऱ्याने ''इंटरनेटवरील सर्वात सुंदर चित्र'' अशी कॉमेंट केली आहे
याआधी आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी तामिळनाडूच्या नीलगिरी जंगलातील मुदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील एका हत्तीच्या पिल्लाच्या बचावाची क्लिप शेअर केली होती. हत्तीचं पिल्लू राष्ट्रीय उद्यानात जखमी अवस्थेत सापडलं होतं, त्यानंतर वन अधिकाऱ्यांनी त्याची सुटका केली आणि त्याला आणि आईला पुन्हा एकत्र आणले. व्हिडीओमध्ये आई हत्तीला शोधण्याच्या मोहिमेत पिल्लू अधिकाऱ्यांच्या सूचनांचे आज्ञाधारकपणे पालन करत असल्याचे दिसून आले.
साहू यांनी पुनर्मिलनाच्या शेवटच्या क्षणांतील आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, जिथे टस्करने त्याच्या आईला काही अंतरावर पाहिल्यानंतर सोंडेतून आवाज काढला. ट्विटरवर ५९०० लाईक्ससह या व्हिडियोला सुमारे ५ लाख व्ह्यूज मिळाले. टस्करची सुरक्षा केल्याबद्दल नेटकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.