बंगळुरू - बेंगळुरूहून मालदीवमधील निघालेल्या गो फर्स्ट फ्लाइटमध्ये 92 प्रवासी प्रवास करत होते. मात्र या फ्लाईटचे कोईम्बतूरमध्ये आपात्कालीन लँडिंग करण्यात आलं होतं. मात्र तामिळनाडूच्या सदोष स्मोक अलार्ममुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचं समोर आलं आहे. कथितरित्या इंजिन जास्त गरम झाल्यानंतर अलार्म वाजला होता. मात्र अभियंत्यांनी सांगितलं की, अलार्म सदोष होता. विमान उडण्यास पूर्णपणे योग्य आहे. (emergency landing news in Marathi)
बंगळुरू ते माले (मालदीव) या 92 प्रवाशांना घेऊन जाणार्या गो फर्स्ट फ्लाइटचे आज दुपारी 12 वाजता कोईम्बतूर विमानतळावर टेकऑफच्या एक तासानंतर आपात्कालीन लँडिग करण्यात आलं होतं.
विमानाचे इंजिनओव्हरहिट झाल्याचा अलार्म वाजल्यानंतर विमानाचे लँडिंग करण्यात आले होते. दरम्यान गो फर्स्ट अभियांत्रिकी टीमद्वारे विमानाची तपासणी केली जात आहे. तसेच आता फ्लाईटची दुरुस्ती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती गो फर्स्टच्या प्रवक्त्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.