नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत भीषण आगीचा घटना घडल्याचं समोर आलं आहे. तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळील ही इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कोणी अडकून पडलंय का? याचा शोध घेतला जात आहे. 30 अग्मिशमन गाड्यांच्या मदतीनं आग विझवण्यात यश आलं आहे. (a huge fire broke out in three storey building in Delhi 20 killed in horrific incident)
दिल्लीच्या अग्मिशमनदलाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले, सध्याकाळी दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील या तीन मजली कमर्शिअल कॉम्प्लेक्सला आग लागली. सध्या युद्धपातळीवर ही आग विझवण्याचं काम सुरु असून अद्याप 27 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे तर १२ जण जखमी झाले आहेत. आग विझवण्यात आली असून अद्याप बचाव कार्य सुरु आहे.
दरम्यान, काहीवेळापूर्वी दिल्लीचे डीसीपी समीर शर्मा यांनी माहिती दिली की, १५ अग्मिशमन दलाचे बंब आग विझवण्याठी घटनास्थळी दाखल झाले असून या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटली नसून बचावकार्य सुरुच आहे. या भीषण आगीतून ५० ते ६० लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.
आग लागली तेव्हा काय होती स्थिती?
शुक्रवारी संध्याकाळी ४.४५ वाजता मुंडका येथील तीन मजली इमारतीला आग लागल्याची माहिती अग्मिशमन दलाला मिळाली. या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. आग लागली तेव्हा या कार्यालयांमध्ये अनेक लोक उपस्थित होते. आग लागल्याचं लक्षात येताच अनेकांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण आगीनं भीषण रुप धारण केल्यानं बहुतेक जण अडकून पडले होते. काही लोकांनी तर जीव वाचवण्यासाठी इमारतीतून बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला. सुरुवातीला पहिल्या मजल्यावर आग लागली नंतर वेगानं ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. दरम्यान, स्थानिकांनी देखील लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पोलिसांनी खिडक्या तोडून सुमारे ६० लोकांना वाचवण्यात यश मिळवलं. दोरखंडाच्या मदतीनं लोकांना वाचवण्यात आलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.