80 हजाराचं विजेचं बिल बघून मानसिक संतुलन बिघडलं, चक्क टॉवरवर चढला

विजबिल जास्त आल्याने एका व्यक्तीचे टेन्शन वाढले आणि तो चक्क विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवरच चढला
viral
viralsakal
Updated on

वाढीव विजबिलाच्या अनेक घटना उघडकीस येत असतात पण विज बिल जास्त आल्याने मानसिक संतूलन बिघडल्याच्या एका घटनेने सोशल मीडियावर हाहाकार माजवलाय. हो, हे खरंय. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील हि घटना आहे. विजबिल जास्त आल्याने एका व्यक्तीचे टेन्शन वाढले आणि तो चक्क विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवरच चढला. या घटनेच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (a mans mental health was disturbed as he got high electricity bill)

viral
कन्हैयालालनंतर पुढचा नंबर तुमचा..; भाजपच्या खासदाराला धमकीचं पत्र

नंदा का पुरा या गावात राहणाऱ्या अशोक निषाद हा वाढीव विजेचं बिल आल्याने विजेच्या तारा असणाऱ्या टॉवरवर चढला. कुटूंबाकडून पोलिसांना माहिती मिळताच पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांला खाली उतरवले.

viral
धक्कादायक! फोटोसाठी शिक्षकांनी दोन दलित विद्यार्थिनींना काढायला लावला गणवेश

अशोक निषादची पत्नी मोना देवी यांनी सांगितले की वीज वितरण विभागाकडून विजेचं बील वाढवून आल्याने अशोक तणावात आला तब्बल 80,700 रुपये विजेचं बील आल्याने त्याचं मानसिक संतूलन खालावले. एवढंच काय तर वीज वितरण कंपनीकडून घरातील वीज कापण्यात आली असल्याचे त्याच्या पत्नीकडून सांगण्यात आले.

सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. नेटकरी या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()