दिल्लीतील शहादरा जिल्ह्यातील विवेक विहार भागातील एका बेबी केअर सेंटरमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान यामध्ये आतापर्यंत 7 नवजात बातकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बाल संगोपन केंद्रात मुले व कर्मचारी उपस्थित होते. अपघातानंतर जीव वाचवण्यासाठी ते इकडे तिकडे धावू लागले.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
अग्निशमन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आग पूर्णपणे विझवण्यात आली आणि एकूण 12 मुलांना वाचवण्यात यश आले, त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला आणि इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुटका करण्यात आलेल्या नवजात बालकांना पूर्व दिल्लीच्या ॲडव्हान्स एनआयसीयू रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अग्निशमन अधिकारी राजेंद्र अटवाल म्हणाले, "रात्री 11:32 वाजता अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाला रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळाली आणि एकूण 16 अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली.
आगीमुळे 2 इमारती प्रभावित झाल्या, एक रुग्णालयाची इमारत आहे आणि उजव्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीच्या 2 मजल्यांनाही आग लागली असून 11-12 जणांना वाचवण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्ली अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, बेबी केअर सेंटर 120 यार्डच्या इमारतीत बांधण्यात आले होते. पहिल्या मजल्यावरून 12 मुलांची सुटका करण्यात आली, त्यापैकी 7 मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला आणि 5 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
बेबी केअर सेंटरच्या शेजारी एक इमारत होती, तीही आगीच्या भक्ष्यस्थानी होती पडली. मात्र सुदैवाने तेथे कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर पडून आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.