Delhi Crime: वय 15, खून दोन... काडीपेटीसाठी अल्पवयीन मुलाने घेतला आणखी एकाचा जीव

Crime News Delhi: मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपींचा परिसरात मोठा प्रभाव आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तो स्वतःची टोळीही चालवतो.
Crime News Delhi
Crime News DelhiEsakal
Updated on

Crime News In Marathi: दिल्लीच्या तिमारपूर भागात नुकतीच एक धक्कादायक घटना घडली, एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या जोरदार वादानंतर २१ वर्षीय अंशुल भाटीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली, संशयितांपैकी एकाने पीडिताकडे काडीपेटीची मागणी केली होती. पीडिताने तीन न दिल्याने आरोपींनी हे पाऊल उचलले.

दरम्यान हे आरोपी अल्पवयीन आहेत. आणि यातील एकावर यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंशुल भाटी गंभीर अवस्थेत असताना त्याला हिंदुराव रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्दैवाने, रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांच्या सहकार्याने गुन्हे आणि न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा पथकांच्या नेतृत्वाखालील तपासात CCTV फुटेज आणि स्थानिक गुप्तचरांसह महत्त्वपूर्ण पुरावे सापडले.

यामुळे घटनेच्या 12 तासांच्या आत दोन संशयित अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. हे दोन्ही संशयित अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे.

Crime News Delhi
Kerala Student: ते 29 तास... एवढा अत्याचार ज्यामुळे तरुणाला उचलावे लागले टोकाचे पाऊल

चौकशी केल्यावर, दोघांनी उघड केले की, त्यांच्यापैकी एकाने पीडित व्यक्तीला सिगारेट पेटवण्यासाठी काडीपेटी मागितली, त्यावेळी यास पीडिताने नकार दिला. तेव्हा त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद वाढत असताना, एका अल्पवयीन मुलाने पीडितावर चाकूने हल्ला केला आणि दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलिसांनी सांगितले.

Crime News Delhi
West Bengal Police: ममता विरुद्ध मोदी वाद टोकाला, प. बंगालमध्ये थेट NIA अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपींचा परिसरात मोठा प्रभाव आहे. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी तो स्वतःची टोळीही चालवतो. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलावर वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर पोलिसांनी त्याला पकडून बालसुधारगृहात पाठवले.

काही दिवसांतच तेथून बाहेर आल्यानंतर आरोपींनी घरफोडीची घटना केली. त्यानंतर तो परिसरातील लोकांना धमकावत होता. शनिवारी अंशुलची हत्या करण्यापूर्वी त्याला तू माझ्या परिसरात काय करतोस, अशी विचारणा केली होती. मोठ्या आवाजात का बोलतोय? या कारणावरून त्याने अंशुलवर वार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.