पश्चिम बंगालच्या (West Bengal) जलपाईगुडीमध्ये (Mosque) असणाऱ्या एका मशीदीची सध्या देशभरात चर्चा सूरू आहे. मशिदीवर असणाऱ्या लाऊड स्पीकरवरून अनेकदा वेगवेगळे वाद झाल्याचं समोर आलंय. मात्र सध्या ही मशीद एका सकारात्म निर्णयासाठी चर्चेत आहे. कारण या मशिदीने लाऊड स्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मशिदीने हा निर्णय एखाद्या वादाच्या पार्श्वभूमीवर घेतला नसून, मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून घेतला आहे.
नमाज (Namaz) पठणाच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून मशिदीचा लाऊड स्पीकर बंद करण्याच्या या निर्णयाचं सर्वच स्तरांतून स्वागत होतंय. एवढ्यावरच न थांबता मशिदीच्या परिसरात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, या संदर्भात मशिदीचे इमाम नजीमुल हक सांगतात की, मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी लाऊडस्पीकरचा बंद करण्यात आला आहे, जेणेकरून मुले आमच्या आवारात कोणत्याही अडथळ्याविना अभ्यास करू शकतील. ते म्हणाले की, शिक्षणाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.