नवी दिल्ली ः निसर्गाच्या लहरीपणामुळे बळिराजासमोरील आव्हाने वाढली असताना राज्यातील शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगरही दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे.
महाराष्ट्रातील पन्नास टक्के शेतकरी कुटुंबे कर्जदार असल्याचे राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेने केलेल्या ग्रामीण शेतकरी कुटुंबांच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. शेतीमध्ये राबणारे हात जास्त असले तरी उत्पन्न कमी मर्यादित असून सालदारी, मजुरीमध्ये मनुष्यबळ कमी आणि उत्पन्न जास्त अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील ग्रामीण शेतकरी कुटुंबांचे मासिक उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने ग्रामीण भागांतील शेतकरी कुटुंबांची स्थिती मांडणारा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यांचा जुलै ते डिसेंबर २०१८ आणि जानेवारी ते जून २०१९ या काळात अभ्यास करण्यात आला होता. यात किमान एक व्यक्ती थेट शेती कामाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. शेती व्यवसायातून वार्षिक किमान ४००० रुपये मिळविणारे कुटुंब शेतकरी मानले जाते. राज्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. राज्यात ५.५ टक्के कुटुंबांकडे ४ ते १० हेक्टर जमीन आहे. अर्थात, मोठ्या प्रमाणात जमीनजुमला बाळगून असणाऱ्यांचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे.
मजुरीतून होणारी आर्थिक प्राप्ती
केवळ ०.६ टक्के शेतकऱ्यांकडे १० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. राज्यातील सात टक्के कुटुंबे पशुपालन आणि इतर पूरक कामांमध्ये तसेच बिगरशेती व्यवसायांमध्ये सहभागी आहेत. ७.४ टक्के कुटुंबे शेतमजुरीवर तसेच आणि बिगरशेतीच्या कामांमधून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून आहेत. परंतु, मजुरी, सालदारी यासाख्या कामातून मिळणारी प्रतिकुटुंब मासिक आर्थिक प्राप्ती ४ हजार ३२४ रुपये एवढी आहे.
शेतीतील उत्पन्न तोकडेच
शेतीच्या कामांमध्ये जास्त मनुष्यबळ असूनही त्यातून मिळणारे उत्पन्न कमीच आहे. मजुरी, इतर रोजगारामध्ये गुंतलेले मनुष्यबळ कमी असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न हे कृषी उत्पादनातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जवळपास जाणारे आहे. महाराष्ट्रामध्ये शेती बटाईसारख्या भाडेकराराने देऊन मिळणारे प्रतिकुटुंब मासिक उत्पन्न अवघे ३४ रुपये, तर पशुपालनातून दरमहा १५४० रुपये मिळतात. बिगरशेती व्यवसायातून मिळणारे मासिक उत्पन्न प्रतिकुटुंब ८४७ रुपये एवढे आहे. शिवाय १२.२ टक्के कुटुंबे फक्त रोजंदारीवर अवलंबून आहेत.
राज्यातील स्थिती
५० टक्के कर्जदार शेतकरी कुटुंबे
८२,०८५ रुपये प्रतिकुटुंब थकबाकी
७२.९४ लाख कुटुंबे थेट शेतीशी संबंधित
५०.१ टक्के कुटुंबांकडे एक हेक्टरपेक्षा कमी जमीन(राज्य)
देशभरातील स्थिती
१०,२१८ रुपये दरमहा शेतीमधून मिळणारे उत्पन्न
११,४९२ रुपये राज्यातील दरमहा प्रतिकुटुंब उत्पन्न
८३.५ टक्के एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेली कुटुंबे (देशातील)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.