Jammu Kashmir Article 370: कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव; भाजप आमदारांनी फाडल्या प्रती
Jammu Kashmir Article 370: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव जम्मू काश्मीर विधानसभेत बुधवारी मंजूर झाला. भाजपच्या विरोधामुळे विधानसभेत मोठा गदारोळ झाला.
जम्मू : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० पुनर्स्थापित करण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेत बुधवारी मंजूर झाला. या मागणीला भाजपच्या आमदारांनी जोरदार विरोध केल्याने जम्मू काश्मीर विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.